सांगलीत परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाच्या फसवणुकीचा प्रयत्न, दोघांना अटक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीच्या एलसीबी पथकाने दोघांना अटक केली आहे. भास्कर माधव तास्के (वय 35 राहणार वाकोली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली), इंद्रजीत बाळासाहेब माने (वय 29 राहणार भादूरवाडी जिल्हा सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीच्या एलसीबी पथकाने दोघांना अटक केली आहे. भास्कर माधव तास्के (वय 35 राहणार वाकोली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली), इंद्रजीत बाळासाहेब माने (वय 29 राहणार भादूरवाडी जिल्हा सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहा वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता
फसवणुकीचा प्रकार सहा वर्षांपूर्वी घडला होता. माने यांनी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी भास्कर तास्के यांना मदत केली होती. या परीक्षेत तास्के राज्यात दुसरा आला होता. त्याची लातूर येथे सहाय्यक कर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर इंद्रजीत हा सुद्धा सहाय्यक कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यांची नियुक्ती मुंबई येथे झाली होती. आयोगाला परीक्षेतील बोगस कागदपत्राची माहिती मिळाली. दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी आयोगाचे उपसचिव सुनील अवताडे यांनी माने, तास्के दोघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
सहा वर्षापूर्वी तास्के यांच्या नातेवाईकांनी माने यांची ओळख करुन दिली होती. परीक्षेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती. आर्थिक व्यवहारही ठरला होता. दिनांक 12 मे ते दिनांक सात जून 2015 या कालावधीत परीक्षेचे फॉर्म भरताना माने यांनी स्वतःची कागदपत्रे भास्कर माधव तासगावकर या नावाने तयार केली. त्यानंतर इस्लामपुरातून त्याने सहाय्यक कर निरीक्षक पदासाठीफॉर्म भरला.
परीक्षा कोल्हापूर येथे झाली त्यावेळी संशयित भास्कर माधव तास्के आणि भास्कर माधव तासगावकर( इंद्रजीत माने) यांचे परीक्षा नंबर पाठोपाठ आले इंद्रजीत याने तास्के यांच्या उत्तरपत्रिकेची आदलाबदल केली. काही महिन्यात निकाल लागल्यानंतर तास्के हा राज्यात अव्वल आला. त्याची नियुक्ती लातूर येथे करण्यात आली होती दरम्यान इंद्रजीत यांचीही लोकसेवा आयोगातून सहाय्यक कर निरीक्षक पदासाठी मुंबई येथे नियुक्ती झाली होती.
जामीनासाठी न्यायालयात धाव
माने आणि तास्के या दोघांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. तर तास्के इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये तीन वेळा नापास झाला होता. त्याने माने यांच्या मदतीने सहाय्यक कर निरीक्षक पदापर्यंत मजल मारली. इंद्रजीत हा अत्यंत हुशार परंतु पैशांच्या लोभासाठी त्याने स्वतःचे करिअर संपून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले.
Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा#AryanKhan | #AnanyaPanday | #NCBhttps://t.co/3RbCuJatoo
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
संबंधित बातम्या :
समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी