Sangli: गुप्तधनापोटी मांत्रिक अब्बासला 1 कोटी! चहातून विष, शेवटी सुसाईड नोटचा कट, पोलिसांनी उलगडला 9 जणांच्या हत्येचा पट
Sangli Crime News : अख्खं कुटुंब बेशुद्ध पडल्यानंतर चलाखी करण्याचा प्रयत्न या दोघांनीही केला. एक बोगस सुसाईड नोट या दोघांनी तयार केली.
सांगली : मिरज तालुक्यातलं म्हैसाळ गाव 20 जूनला हादरलं. अख्ख वनमोरे कुटुंब या दिवशी संपलं. ही सामूहिक आत्महत्या (Sangli Murder) असल्याचं भासवलं गेलं. सुरुवातीला सगळ्यांचा यावर विश्वासही बसला. पण ही आत्महत्या (Sangli Suicide) नव्हती. हत्याच होती! 9 जणांचे मारेकरी असलेल्या दोघांना वाटलं, की आपण सुटलो. आपल्यावर कुणालाच संशय आलेला नाही. पण सांगली पोलिसांनी अवघ्या सात दिवसात आत्महत्या की हत्या, याचं गूढ उकललं. दोघा मुख्य आरोपींना अटक (Murder Mystery) केली. यानंतर संपूर्ण घटनाक्रम काय होता, तेही सांगितलं. चहातून विष देऊन मांत्रिक अब्बास आणि त्याचा ड्रायव्हर वनमोरेंच्या घरातून पळाले. पण त्याआधी त्यांनी ही हत्या वाटू नये, यासाठी सुसाईड नोट लिहिण्याचा कट रचला. सुसाईड नोटही लिहिलीही. ही सुसाईड नोटंच होती, या हत्याकांडांच्या खुलाशाचं प्रमुख अस्त्र.
दिशाभूल करताना स्वतःच अडकले
पोलिसांना गंडवण्यासाठी लिहिलेली सुसाईड नोटच मांत्रिक अब्बास आणि त्याचा ड्रायव्हर धीरजला गजाआड घेऊन गेली. चहातून मांत्रिक अब्बास आणि त्याच्या ड्रायव्हरने वनमोरे कुटुंबाला विष दिलं. अख्खं कुटुंब बेशुद्ध पडल्यानंतर चलाखी करण्याचा प्रयत्न या दोघांनीही केला. एक बोगस सुसाईड नोट या दोघांनी तयार केली. या नोटमधील मजकुरानं पोलिसांना संशय आला. त्यातून पुढे तपास केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं. एक संशयास्पद गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. अखेर दोघांना पोलिसांना शोधून काढलं आणि त्यानंतर पोलीस खाक्या दाखवून दोघांची कसून चौकशी करण्यात आली.
सुसाईट नोटवर संशय का?
सुसाईड नोटमध्ये सर्वसामान्यपणे आत्महत्येचं कारण लिहिलं जातं आणि त्यानंतर जो कुणी आत्महत्येला जबाबदार असतो, त्यांची नावं असतात. पोलिसांच्या तपासातील या बेसिक थिएरीने मांत्रिकाला अडचणीत आलं. सुसाईज नोटच्या सुरुवातीलाच आत्महत्येला जबाबदार कोण यांची नावं लिहिली गेली होती. अख्खं कुटुंब का आत्महत्या करतंय, याचा कोणताच उल्लेख त्यात नव्हता. सावकारांची नाव सुसाईड नोटमध्ये लिहून दिशाभूल करण्याचा प्रयत्न मुख्य आरोपी आणि मांत्रिक असलेल्या मोहम्मद अली बागवान आणि त्याचा ड्रायव्हर धीरज सुरवसेने केला होता.
..म्हणून हत्या?
मांत्रिक अब्बास गुप्तधन शोधून देईल यायची आस वनमोरे कुटुंबाला होता. त्यासाठी अब्बासने एक कोटी रुपये इतकी रक्कम वनमोरेंकडून घेतली होती. कर्ज काढून, कुणाकडून पैसे घेऊन हे पैसे वनमोरे बंधूंनी जमवले होते. त्यानंतर जेव्हा आर्थिक अडचण भासू लागली, तेव्हा या पैशांची मागणी अब्बासकडे केली जात होती. एक दिवस अब्बास आपल्या ड्रायव्हरसर आहे. गुप्तधन शोधून देतो म्हणून त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. वनमोरे कुटुंब आपले एक कोटी रुपये परत मिळावेत म्हणून अब्बासकडे तगादा लावत होते.
गच्चीतून जेव्हा वनमोरे कुटुंबीय तुम्ही खाली घरात आले, तेव्हा अब्बासने वनमोरे कुटुंबाला चहा पाजला. या चहात त्यानं विष कालवलं होतं. एक एक करुन प्रत्येकजण चहा पिऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर आपल्यावर हत्येचा आळ येऊ नये, यासाठी अब्बासने सुसाईड नोट लिहून हत्याकांड रचलं!