शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

या हल्ल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या हल्ल्याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?
हल्ला करण्यात आलेले शिवसेनेचे शहर प्रमुख...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 2:41 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली (Sangli crime News) जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon) येथील शिवसेनेच्या शहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चाकू आणि लोखंडी रॉडसह हा हल्ला करण्यात आल्याची माहितीसमोर आली. याप्रकरणी सांगली पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगलीतील तासगाव पोलिसांकडून केला जातोय.

तासगाव शिवसेना शहर प्रमुख संजय चव्हाण यांच्यासह चौघांवर हल्ला करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडालीय. संजय चव्हाण यांच्यासोबत प्रमोद सावंत, रोहित सावंत, प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर यांच्यासह अन्य दोघांविरोधात या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेना शहर प्रमुख हल्ला झाल्यानं सांगलीतील राजकारणही ढवळूननिघालं आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदैवानं या हल्ल्यातून सगळे जण अगदी थोडक्यात बचावलेत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आलीय.

हे सुद्धा वाचा

पैशांच्या दैवाणघेवाणीतून हा हल्ला झाला असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. तासगाव पोलीस या हल्लाप्रकरणी अधिक तपास करत आहेत. संजय चव्हाण आणि प्रमोद सावंत यांच्यातील आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्या असल्याचं सांगितलं जातंय.

संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंत यांना काही पैसे दिले होते. त्या पैशांच्या परफेडीची मागणी केली असता सावंत यांनी चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चव्हाण यांच्या मुलांकडूनही सावंत यांना जाब विचारण्यात आला.

दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबत असलेल्या रोहित सावंत याने चव्हाण यांच्यावर वार केला. तो वार चुकवत असताना चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला जखम झाली. इतक्यात दुसऱ्या एकाने चव्हाण यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. दरम्यान, वडिलांना वाचवण्यासाठी चव्हाण यांच्या मुलांना प्रयत्न केला. पण त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.