ठाकरे सरकार पडल्यानंतर संजय पांडेच्या मागे ED ची पीडा; मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
जुन्या एका गैरव्यवहार प्रकरणात संजय पांडे यांचा सहभाग आढळला आहे. यामुळे ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता संजय पांडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ED ने दिले आहेत. तशा प्रकारची नोटीस ED ने त्यांना बजावली आहे.
मुंबई : निवृत्ती नंतर संजय पांडेच्या(Sanjay Pandey) मागे ED ची पीडा लागली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मनी लाँडरिंग(Money laundering case) प्रकरणी समन्स बजावले आहे. या प्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ED ने दिले आहेत. यामुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. यानंतर आता निवृती नंतर देखील ते चर्चेत आले आहेत.
जुन्या एका गैरव्यवहार प्रकरणात संजय पांडे यांचा सहभाग आढळला आहे. यामुळे ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता संजय पांडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ED ने दिले आहेत. तशा प्रकारची नोटीस ED ने त्यांना बजावली आहे.
30 जूनल संजय पांडे यांची सेवा निवृत्ती झाली. त्यांच्याजागी विवेक फणसाळकर यांची नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सेवा निवृत्ती होऊन चार दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावल्याने चर्चेला उधाण आले आहे. संजय पांडे हे राज्याचे डीजीपी असताना त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खटला सौम्य करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. आता एका जुन्या मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.
संजय पांडे यांची कारकिर्द
संजय पाडे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयआयटी कानपूरमधून त्यांनी संगणक विज्ञान पदवी मिळवली. संजय पांडे यांचा १ मार्च ते आत्तापर्यंतचा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून ४ महिन्यांचा प्रवास बराच वादग्रस्त ठरला. अनेक अधिकारी त्यांनी नमूद केलेल्या गुन्ह्याची नोंद करण्यास नकार दयायचे. भाजपच्या एका नेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश अमान्य करत एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैद्यकीय रजेवर गेले होते.
संजय पांडे शिवसेनेच्या जवळचे
संजय पांडे हे शिवसेनेच्या जवळचे मानले जातात. ते पोलिस आयुक्त पदी असताना त्यांनी शिवसेनेविरोधात आवाज उठवल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नारायण राणे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर संजय पांडे यांच्यावर ते महाविकास आघाडी सरकारचे एजंट असल्याची घणाघाती टीका केली होती.