Santosh Deshmukh Case : मोठी बातमी, संतोष देशमुख प्रकरण, एका अधिकाऱ्यासह दोघांना SIT मधून हटवलं

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. SIT मधून तिघांना हटवण्यात आलं आहे.

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी, संतोष देशमुख प्रकरण, एका अधिकाऱ्यासह दोघांना SIT मधून हटवलं
mahesh vighne & manoj wagh
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 10:14 AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांच्या अंगलट आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सीआयडीला शरण आला होता.

राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पकडू असा स्थानिक गुन्हे शाखेचा दावा आहे.

क्रूर पद्धतीने निर्घृण हत्या

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीची स्थापना केली, नंतर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक बनवण्यात आलं. वाल्मिक कराड हाच या प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.