Manoj Jarange Patil : ‘भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी…’, धनंजय देशमुख सोबत असताना मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : "मी पुन्हा तेच सांगतो, देशमुख कुटुंब एकटं नाही. समाज खरोखर पाठिशी आहे. एकदा समाजाला वाटलं की, सरकार दिशाभूल करतय, दिखाऊपणा करतय, त्या दिवशी हे राज्य बंद पडलेलं दिसेल. तुम्ही गुंड आरोपी पोसताय का? फरार आरोपी पोसताय का?" असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil : 'भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी...', धनंजय देशमुख सोबत असताना मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
Manoj Jarange Patil-dhananjay deshmukh
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 12:06 PM

“शेवटी काय असतं बघा, झालेला आघात, झालेलं दु:ख हे सहन होण्यापलीकडच आहे. शेवटी ज्याला त्यालाच कळतं. आपल्या भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असतात, ते दु:ख वेदना शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचं कुठे मन लागत नाहीय, या जगात भाऊ दिसत नाही” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच सांत्वन केलं. धनंजय देशमुख यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या शेजारी बसले होते. धनंजय देशमुख आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली-सराटीमध्ये आले होते. “शेवटी न्याय द्यायला सरकार उशीर करतय. आरोपी सापडायला 25-30 दिवस लागतायत, शेवटी घालमेल आहे. एवढा दु:खाचा डोगंर कोसळलाय. घालमेल प्रचंड आहे. त्या कुटुंबाला जीवन असूनही सुद्धा नसल्यासारख झालेलं आहे. हा आघात सगळ्या मराठा समाजावर, राज्यातल्या जनतेवर झालाय, कारण इतकी क्रूर हत्या आतापर्यंत झालेली नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, ते मी ऐकून घेणार आहे. माझ्या समाजाला त्यांच्या भावना सांगणार आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आम्ही कोणाला सोडणार नाही. खून करणारे आरोपी असोत, त्यांना पाठबळ देणारे असोत, त्यांना लपवून ठेवायला मदत करणारे असोत, यांना सोडणार नाही. राज्यातल्या सगळ्या क्षेत्रात सरकारने, गृहमंत्रालयाने सांगून ठेवायला हव होतं दिसला की कळवा. जर दिसला तरी कळवला नाही, तर त्याला सहआरोपी करायचं काम सरकारने केलं पाहिजे. आरोपी कसे हाती लागत नाहीत? गृहमंत्रालयाने तातडीने हे आदेश काढले पाहिजेत. काही दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागले की, मग लपवून ठेवणारे कोणीही असो, त्याला सुद्धा सहआरोपी करणार असा कडक आदेश गृहमंत्रालयाने काढला पाहिजे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘तुम्ही काळीज करु नका’

“हा मराठा समाज, राज्यातील जनता देशमुख कुटुंबाच्या पाठिशी आहे. सरकारने दगाफटका केला तरी हा समाज सरकारला वठणीवर आणेल. संतोष भय्याला न्याय देण्याची क्षमता या समाजात आहे. कुटुंबाला समाजाच्या आधाराची गरज आहे. समाजाने त्यांना आधार द्यावा. सरकार जनता आहे. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपला मराठा समाज सक्षम आहे. तुम्ही काळीज करु नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.