Walmik Karad : CID कोठडीत वाल्मिक कराड पडला आजारी, तुरुंगातून प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट
देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन सुरु.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक महिना उलटला. हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड शरण आला. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे. तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी. गुन्हे शाखेकडून आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे हे आरोपी अटकेत आहेत.
दरम्यान वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. नऊ दिवसांपासून वाल्मीक बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराड आजारी पडला आहे. वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत. CID कडून आज त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होईल.
ग्रामपंचायतीला कुलूप
संतोष देशमुखच्या हत्येला आज तीस दिवस पूर्ण झालेत. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी रिपाई आठवले गटाकडून कंकालेश्वर मंदिरात साकडे घातले आहे. चार दिवसात हत्येचे स्पष्टीकरण द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हत्या प्रकरणावरून रिपाई आक्रमक झाली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ अशा अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आज बंद आहेत.
आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज बंद व ग्रामपंचायतीला कुलूप दिसत आहे. सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांनी बंदची हाक अनेक ठिकाणी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन.