VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?
'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बिघडलेली व्यवस्था या थीम अंतर्गत पोलिस यंत्रणेविषयी अनेक खुलासे करण्यात आले (Sanjay Pandey Aamir Khan)
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी नुकताच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट देशमुखांनी दिल्याचा आरोप सिंहांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आयपीएस अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) या शोमध्ये सूत्रसंचालक आणि अभिनेता आमीर खानला (Aamir Khan) पांडेंनी वसुलीचं गणित सांगितलं होतं. (Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)
‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बिघडलेली व्यवस्था या थीम अंतर्गत पोलिस यंत्रणेविषयी अनेक खुलासे करण्यात आले. 8 ऑगस्ट 2016 रोजी हा एपिसोड टेलिकास्ट झाला होता.
काय म्हणाले होते संजय पांडे?
आमीर खान : जनतेचा दृष्टीकोन आहे, की पोलीस किंवा हवालदार आमच्याकडून रस्त्यावर पैसे म्हणजे लाच घेतात. सामान्य माणूस असो, रिक्षावाला असो किंवा बस… मी बरोबर बोलतोय का? (टाळ्यांचा कडकडाट) तर तो (पोलीस) कमी कमवतोय, पण आमच्याकडून तर खूप वसूल करतोय. मग त्याचं उत्पन्न चांगलंच असणार…
संजय पांडे : उत्पन्न त्या माणसापर्यंतच सीमित राहत असतं, तर मी मान्य केलं असतं. ही सगळी रक्कम तो गोळा करुन घरी घेऊन जात असेल, यावर माझा विश्वास नाही.
आमीर खान : मग हा पैसा जातो कुठे?
संजय पांडे : आपण लोकशाहीत आहोत. प्रत्येकाचे वरिष्ठ असतात, त्यांचे वरिष्ठ असतात. राजकीय नेते असतात.. ही एक साखळी आहे.
आमीर खान : दुकानदारांकडून मिळालेले हफ्ते, पैसे कुठेतरी अन्यत्र वाटले जातात का? (Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)
संजय पांडे : सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर इथे दोन प्रकार आहेत… एक म्हणजे असंघटित (disorganised) यंत्रणा.. रस्त्यात चालताना कोणी दिसलं.. विचारलं, की परवाना आहे का? नाही.. मग काहीतरी अॅडजस्ट करु.. म्हणजे किती जण पकडले जातील माहिती नाही, आज दहा मिळतील, उद्या पन्नास..
दुसरी आहे संघटित यंत्रणा. काही रेस्टॉरंट, लिकर बार, डान्स बार आहेत… महाराष्ट्रात तर त्यांच्यावर बंदीही आहे. यांच्याकडून वसुलीची व्यवस्थित यंत्रणा राबवली जाते. याचं अंदाजपत्रक तयार असतं. आपल्याकडे इतके रेस्टॉरंट आहेत, तर इतके पैसे येणार. जसं तुमचा स्टुडिओ रात्री चालू ठेवला. तर तुम्हाला द्यावे लागणार.
पाहा व्हिडीओ : (7.05.00 पासून पुढे)
संबंधित बातम्या :
NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?
फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार
(Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)