Gondia accident : गोंदियात स्कूल बस 30 फूट खोल कोसळली, चालक जखमी, विद्यार्थ्यांना सोडून परतताना अपघात

एसेंट पब्लिक स्कूलची ही बस होती. चालक लांजेवार विद्यार्थ्यांना सोडून परत येत होते. तेवढ्यात रिंग रोड बायपासचा पूल उतरताना हा अपघात झाला. घटनेची माहिती झाल्यानंतर पालक चिंताग्रस्त झाले होते.

Gondia accident : गोंदियात स्कूल बस 30 फूट खोल कोसळली, चालक जखमी, विद्यार्थ्यांना सोडून परतताना अपघात
गोंदियात स्कूल बस 30 फूट खोल कोसळली
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 7:24 PM

गोंदिया : गोंदियात आज एक मोठा अपघात झाला. स्कूल व्हॅन (school van) तब्बल तीस फूट खोल खड्ड्यात गेली. यात स्कूल व्हॅनचे नुकसान झाले. चालकही जखमी झाला. या व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यानं फार मोठी दुर्घटना टळली. गोंदिया येथील एसेंट पब्लिक स्कूलच्या व्हॅनचा अपघात (accident) झाला. ही व्हॅन एसेंट पब्लिक स्कूल राणी अंतीबाई चौक येथील आहे. ही व्हॅन सकाळी तेरा विद्यार्थ्यांना (student) शाळेत सोडून परत जात असताना हा अपघात झाला. गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना गाडीचा स्टेरींग लॉक झाले. त्यामुळे अपघात झाल्याने स्कूल व्हन 30 फूट खोलात जाऊन कोसळली. गाडी चालक भूमेस्वर लांजेवार हा या अपघातात जखमी झाला आहे.

स्टेरींग लॉक झाल्याने अपघात

एसेंट पब्लिक स्कूलची ही बस होती. चालक लांजेवार विद्यार्थ्यांना सोडून परत येत होते. तेवढ्यात रिंग रोड बायपासचा पूल उतरताना हा अपघात झाला. घटनेची माहिती झाल्यानंतर पालक चिंताग्रस्त झाले होते.

विद्यार्थ्यांना सोडून परतताना अपघात

व्हॅलचालक भूमेश्वर लांजेवार हा मुलांना सोडून परतत होता. त्यामुळं व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना व्हॅनचे स्टेरींग लॉक झाले. त्यामुळं हा अपघात झाल्याच चालकानं सांगितलं. रस्त्याच्या खाली बांधात ही व्हॅन कोसळली. चालक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

व्हॅनमध्ये विद्यार्थी असते तर…

या व्हॅनमध्ये तेरा विद्यार्थी रोज प्रवास करतात. विद्यार्थी व्हॅनमध्ये असते आणि अपघात झाला असता तर फार मोठी दुर्घटना घडली असती. परंतु, विद्यार्थ्यांना सोडून परतत असताना हा अपघात झाला. त्यामुळं बरं झालं. अपघाताची बातमी मिळताच विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले. आपली मुलं या व्हॅनमध्ये असते तर ही कल्पनाच त्यांना करवत नव्हती. यापुढं चालकानं आधी व्हॅन व्यवस्थित करून घ्यावी. त्यानंतरच मुलांना बसवावं, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.