Accident | इचलकरंजीत स्कूल बसला अपघात, लालपरीशी धडक, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

इचलकरंजीः इचलकरंजी शहरात आज भीषण अपघात (Accident) झाला. शहरातील जनता चौकात राज्य परिवहन मंडळाची बस आणि एक खासगी स्कूल बस (School Bus) यांची धडक झाली. जनता चौकात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात काही प्रवासी आणि विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बसचंही मोठं नुकसान झालं. यातील काही मुलांना गंभीर जखम झाली असून […]

Accident | इचलकरंजीत स्कूल बसला अपघात, लालपरीशी धडक, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:47 PM

इचलकरंजीः इचलकरंजी शहरात आज भीषण अपघात (Accident) झाला. शहरातील जनता चौकात राज्य परिवहन मंडळाची बस आणि एक खासगी स्कूल बस (School Bus) यांची धडक झाली. जनता चौकात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात काही प्रवासी आणि विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बसचंही मोठं नुकसान झालं. यातील काही मुलांना गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इचलकरंजी (Ichalkaranji) शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसात यामुळे जीवितहानीदेखील जास्त झाली आहे. आजच्या अपघातात स्कूल बसचंही नुकसान झालं तसंच एसटी बसच्याही काचा फुटल्या.

नेमकी घटना काय घडली?

शहरात आज जनता चौकामध्ये स्कूल बस आणि एसटीचा अपघात झाला. स्कूल बसचा ड्रायव्हर अमीन पटेल हे बस घेऊन शाहू कॉर्नर कडून जनता बँक चौकाकडे येत होते. तर एसटी चालक अजित कांबळे एसटी घेऊन गांधी पुतळा होऊन एसटी स्टॅन्डकडे जात होते. सकाळी आठच्या सुमारास दोन्ही गाड्या समोरा-समोर आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दोन्ही बस एकमेकांवर धडकल्या. यात स्कूल बसच्या ड्रायव्हर कडील बाजूस मोठा धक्का बसला. स्कूल बसमधील सीटवर बसलेले विद्यार्थी जखमी झाले आहेत तर एसटी समोरून धडक दिल्यामुळे एसटीची काच फुटली आहे यामध्ये दोन्ही वाहनातील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरू

या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनता चौकांमध्ये अपघात घडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. ही स्कूलबस आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमध्ये जात होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि पालक अपघात स्थळी आले. काही मुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर स्कुलबस ड्रायव्हर अजित पटेल हा ही किरकोळ जखमी झाला आहे. अपघात इतका मोठा होता की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

स्कूल बस चालकांवर रोष

दरम्यान, शहरात स्कूल बस चालवणाऱ्यांविरोधात पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. शहरातील गजबजलेल्या भागांतूनही हे बसचालक भरधाव वेगाने वाहने नेतात. वाहतूक नियम पाळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.