शिक्षक-शिक्षिका रोज दोघे एकत्र बाईकवरुन शाळेत यायचे, मग एक दिवस असं घडलं की….
राहुल कुमार शिक्षक म्हणून नोकरी करत होता. राहुल रोज बाईकवरुन शाळेत जायचा. त्याचवेळी शाळेत जाण्याचा एकच मार्ग असल्याने अमृता त्याच्यासोबत बाईकवरुन शाळेत यायची.
शिक्षकांच काम असतं, विद्यार्थी घडवणं. समाजासाठी एक आदर्श नागरिक निर्माण करणं. शिक्षकाच स्वत:च आचरण, कृती तशी असावी लागते, त्यातून विद्यार्थी आदर्श घेतात. पण शिक्षकांनाच आपल्या या जबाबदारीचा विसर पडला तर? अशीच एक घटना समोर आली आहे. एक शिक्षक आपल्याच शाळेतील शिक्षिकेला घेऊन पळून गेला. लेडी टीचर घरी परतली नाही, तेव्हा तिचे कुटुंबीय टेन्शनमध्ये आले. त्यानी शिक्षिका बेपत्ता झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तपासात समोर आलं की, शिक्षक आणि शिक्षिकेच प्रेम प्रकरण सुरु होतं, दोघे पळून गेले. शिक्षिकेच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, शिक्षकाने त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल केलं. तिला किडनॅप केलय. पोलीस दोन्ही बाजुंनी तपास करत आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील हे प्रकरण आहे.
कुढनी प्रखंड तुर्की पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. लक्ष्मीपूरच्या प्रायमरी शाळेत शिकवणारे दोन शिक्षक पळून गेले. शिक्षकांनीच असं काम केल्याने आता या भागात वेगवेगळ्या उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. जेव्हा शिक्षकच असं वागणार, तर मुल त्यांच्याकडून काय शिकणार? असं बोललं जातय. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
त्यांच्यातील प्रेमसंबंध बहरत गेले
अमृता कुमारी असं पळून गेलेल्या शिक्षिकेच नाव आहे. ती वैशाली जिल्ह्यात सराय थाना क्षेत्रात राहते. BPSC मधून निवड झाल्यानंतर तिने नुकतीच लक्ष्मीपूर येथील शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. त्याच शाळेत वैशाली जिल्ह्यात गंगाब्रिज थाना क्षेत्रात राहणारा राहुल कुमार शिक्षक म्हणून नोकरी करत होता. राहुल रोज बाईकवरुन शाळेत जायचा. त्याचवेळी शाळेत जाण्याचा एकच मार्ग असल्याने अमृता त्याच्यासोबत बाईकवरुन शाळेत यायची. रोज एकत्र येत-जात असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध बहरत गेले. अखेर 30 नोव्हेंबरला दोघे गायब झाले.
‘राहुलने माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं’
लेडी टीचर अमृताच्या आईने गंगाब्रिज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. अमृता राहुलसोबत पळून गेल्याच समजल्यानंतर त्यांनी राहुल कुमार विरोधात मुलीच अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. अमृताच्या आईने सांगितलं की, त्यांची मुलगी नेहमीप्रमाणे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी निघाली. पण रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यांनी आरोप केला की, राहुलने माझ्या मुलीला ब्लॅकमेल करुन तिचं अपहरण केलं. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु असून दोघांना शोधून काढण्याच्या मागे लागले आहेत.