भयानक! अहमदाबादेत 7व्या मजल्यावर लिफ्ट तुटली, 7 मजुरांचा जागीच मृत्यू

ही 13 मजली इमारत आहे. मृत्यू पावलेले सर्व मजदूर आठव्या मजल्यावर होते. लिफ्टची केबल तुटली. त्यामुळे सर्वजण सातव्या मजल्यावर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भयानक! अहमदाबादेत 7व्या मजल्यावर लिफ्ट तुटली, 7 मजुरांचा जागीच मृत्यू
भयानक! अहमदाबादेत सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली, सातमजुरांचा जागीच मृत्यू Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 2:13 PM

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. निर्माणाधीन असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली (lift accident). त्यामुळे या सात मजुरांचा (labourers) जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी मजूरांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी एका मजदूराची प्रकृती अधिक गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

या दुर्घटनेची आम्हाला माहिती दिली गेली नाही. आम्ही बातम्या पाहिल्यानंतर कळालं. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं. प्रशासनातील इतर अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनीही येथील सुविधांची पाहणी सुरू केली आहे.

ही 13 मजली इमारत आहे. मृत्यू पावलेले सर्व मजदूर आठव्या मजल्यावर होते. लिफ्टची केबल तुटली. त्यामुळे सर्वजण सातव्या मजल्यावर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मृतांची नावे

संजयभाई बाबूभाई नायक (20 वर्ष) जगदीशभाई रमेशभाई नायक (21 वर्ष) अश्विनभाई सोमभाई नायक (20 वर्ष) मुकेश भरतभाई नायक (25 वर्ष) राजमल सुरेशभाई खराडी (25 वर्ष) पंकजभाई शंकरभाई खराडी (21 वर्ष)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.