चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीला घेऊन जायचा, मग गावात राहणारा आजोबाच…

पुण्यातील मुळशी तालुक्यात भयानक घटना उघडकीस आली आहे. गावातील ओळखीचा 70 वर्षाचा व्यक्ती दररोज मुलीला शाळेतून घरी घेऊन जायचा.

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीला घेऊन जायचा, मग गावात राहणारा आजोबाच...
पुण्यात 70 वर्षाच्या आजोबाकडून मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 10:40 AM

पुणे / विनय जगताप-रणजित जाधव : चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेऊन 9 वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्याच्या मुळशी तालुक्यात ही धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

ओळखीचा फायदा घेत मुलीशी गैरकृत्य

आरोपी हा एकाच गावातील असल्याने त्याची पीडित कुटुंबाशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तो मुलीच्या शाळेत जायचा आणि तिच्या शिक्षिकेला तिच्याकडे काम आहे सांगून तिला स्वतःच्या घरी घेऊन घ्यायचा. मग तिच्यावर बलात्कार करायचा. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा.

एका व्हिडिओमुळे घटना उघड

मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याने तिची आई सात वर्षापूर्वी घर सोडून निघून गेली आहे. मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह काका-काकू आणि आजोबांसोबत राहते. मंगळवारी मुलीच्या नात्यातील भावाच्या मोबाईलवर आरोपी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आला. त्याने तो मुलीच्या आजोबांना दाखवला. व्हिडिओवरुन ही आपलीच नात असल्याची खात्री पटताच आजोबांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता मुलीने सर्व सांगितले.

आरोपीला अटक

यानंतर मुलीच्या आजोबांनी पौड पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरुन पौड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळं पौड मध्ये खळबळ उडाली आहे. मुळशी तालुक्यातील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तर नराधम आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी मुळशीकर करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.