खळबळजनक! शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार, एकाचा मृत्यू, व्यापाऱ्यांमध्ये घबराट, काय घडतंय?

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पंडित नाक्यावर असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सजवळ रात्री झालेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजारपेठ बंद ठेवली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, 48 तासात अटक न झाल्यास व्यापाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

खळबळजनक! शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार, एकाचा मृत्यू, व्यापाऱ्यांमध्ये घबराट, काय घडतंय?
शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार, एकाचा मृत्यू, व्यापाऱ्यांमध्ये घबराट
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 5:17 PM

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका गोळीबाराच्या घटनेमुळे हादरला आहे. शहापूर शहरातील पंडित नाका येथील बाजारपेठेत असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही शनिवारी रात्री घडली. शहापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी पंडित नाक्यावरील बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री 9 ते साडे नऊ वाजता दोन अज्ञात मारेकरी मोटरसायकल वरून आले. त्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार केला. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्समधील कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे शहापुरात एकच खळबळ उडाली आहे. शहापूरच्या नागरिकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. गोळीबाराच्या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण शहापूर शहारातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना घटनेचा लवकरात लवकर तपास करा आणि आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. पोलिसांनी 48 तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान, या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या घटनेवर पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शहापुरात काल रात्री झालेल्या पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्समधील गोळीबारामध्ये दिनेशकुमार चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजले आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटनेचा योग्य तपास करून, आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांडेल यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.