Sharad Mohol | तीन भाईंच्या बैठकीत गेमचा कट, ‘त्या’ गोष्टीचा बदला, शरद मोहोळ हत्याकांडातील सनसनाटी खुलासा

Sharad Mohol murder case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला अनेक दिवस उलटून गेले, तरी रोज नवनव्या गोष्टींचा खुलास होत असतो. या हत्याप्रकरणी आता आणखी एक माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर याने शरदची हत्या का केली याचं कारण समोर आलं आहे.

Sharad Mohol | तीन भाईंच्या बैठकीत गेमचा कट, 'त्या' गोष्टीचा बदला, शरद मोहोळ हत्याकांडातील सनसनाटी खुलासा
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 10:14 AM

पुणे | 17 जानेवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच शरद मोहोळ याच्या घरी जेवून, नंतर मुन्ना पोळेकरने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो पसार झाला. गेल्या १०-१२ दिवसांत याप्रकरणी अनेक माहिती समोर येत आहे. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे तसेच गुंड विठ्ठल शेलार यालाही अटक केली असून त्यांच्या चौकशीतून अनेक नवे खुलासे होत आहेत. आता यासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं.

मामाचा अपमान सहन झाला नाही

यासंदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठीच नामदेव कानगुडे याच्या टोळीकडून शरद मोहोळची हत्या करण्यात आली अशी माहिती उघड झाली आहे. शरद मोहळेने नामदेव कानगुडे याचा अपमान केला होता. मामाचा अपमान सहन न झाल्याने मुन्ना पोळेकरनेच शरद मोहोळची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याच्याशी देखील शरद मोहोळचा जुना वाद होता. विठ्ठल शेलार याच्यावरती हिंजवडी परिसरात हल्ला झाल होता. शरद मोहोळच्या आदेशावरूनच त्याच्या टोळीने शेलारवर हल्ला केला होता.

तीन भाईंच्या बैठकीत गेमचा कट

यामुळे विठ्ठल शेलार आणि अपमानामुळे नादेव कानगुडे, मुन्ना पोळेकर यांच्या मनात राग धुमसत होता. त्यामुळेच त्यांनी एकत्र येत त्याच्या हत्येचा प्लान रचला. तिघांनी एकत्र बैठक घेऊन हत्येचा कट रचला आणि तो अमलात आणला. नामदेव कानगुडे यांनी अनेक दिवस शरद मोहोळच्या टोळीतच काम केलं होतं. त्यांचा शरदने अपमान केला, त्याचा बदला घेण्यासाठीच हे हत्याकांड घडलं.

या हत्याकांडा प्रकरणी पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकांना अटक केली असून त्यामध्ये विठ्ठल शेलार आणि मारणे टोळीतील रामदास मारणे या दोघांचाही समावेश आहे. तर नामदेव कानगुडे याला आधीच पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. शरद मोहोळ प्रकरणी आणखीन एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस अटक करणार आहेत. नामदेव कानगुडे, विठ्ठल शेलार आणि आणखीन एका आरोपीने एकत्रित बैठक घेत शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला होता . त्या आरोपीबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हत्येपूर्वी झाडावर गोळीबारचा सराव, ते झाडच गायब

मारेकऱ्यांनी शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी झाडावर गोळीबारचा सराव केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात रात्री १ वाजता मुळशीमधील हाडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता. झाडाच्या बुंध्यावर सहा गोळ्या झाडल्याचे मारेकऱ्यांनी सांगितले होते. पुणे पोलीस झाडाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले. परंतु घटनास्थळावर झाडच नाही. झाड ज्या जागेत होते, त्या ठिकाणी पोलिसांना मिळाले नाही. यामुळे पोलिसांनी जागेचे मुळ मालक सचिन अनंता खैरे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दहा महिन्यांपूर्वी बांधकामादरम्यान झाड तोडल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.