Sharad mohol murder | शरद मोहोळला संपवणाऱ्या आरोपींची ‘त्या’ वकिलांसोबत आधीच ‘मीटिंग’

Sharad mohol murder case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या झाली. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या हत्येप्रकरणातील आरोपींना सहा आरोपींना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरला.

Sharad mohol murder | शरद मोहोळला संपवणाऱ्या आरोपींची 'त्या' वकिलांसोबत आधीच 'मीटिंग'
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 7:51 AM

पुणे | 12 जानेवारी 2024 : पुणं शहर शरद मोहोळच्या हत्येच्या धक्क्यातून अद्याप सावरलेलं नसतानाच, रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. शुक्रवार,५ जानेवारीला शरद मोहळ याची त्याच्याच घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानुगडे हे यातील मुख्य आरोपी आहेत. तर या हत्येसाठी पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय मटकर आणि सतीश शेंडगे यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिस या हत्या प्रकरणाचा कसून तपास करत असून आता या प्रकरणी आणखी मोठी माहिती समोर आली आहे.

आरोपींची वकिलांसोबत झाली होती मीटिंग

शरद मोहळ हत्या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची या वकिलांसोबत आधीच “मीटिंग” झाली होती. हत्येचा हा कट बऱ्याच काळापासून शिजत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला , त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच शरदची हत्या झाली. पण तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबरमधला हत्येचा प्लान अयशस्वी

या प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येते. त्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहळ याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात आरोपींना यश मिळालं नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. ॲडव्होकेट. संजय उढाण याचे एका हत्याकांडातील एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्या दोन्ही वकिलांना शरद मोहोळच्या खुनाच्या प्लानची संपूर्ण माहिती होती, असेही पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. मोहोळ याच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲ ड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे.

लग्नाचा वाढदिवशी साधला डाव

शरद मोहोळ याचा खून करण्याचे मुन्ना याने निश्चित केले. शरद याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरद मोहोळ याच्या घरी त्याच्या माणसांची वर्दळ होती. जवळच्या लोकांचे जेवण झालं, त्यात मुन्नाही होता. पाच जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मुन्ना आणि शरद मोहोळ याच्या घरी जेवण करायला बसला. जेवण झाल्यानंतर शरद मोहोळ आणि मुन्ना देवदर्शनासाठी एकत्रच बाहेर पडले. त्यावेळी शरद मोहोळ याचे नेहमीचे साथीदार त्याच्यासोबच नव्हते. मुन्ना याने हा मोका साधत त्याच्या साथीदारांसह शरदवर हल्ला चढवला. त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडून ठार केले.

तेव्हापासूनच राग मनात धुमसत होता

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार घडत होती. त्याचाच राग आरोपींच्या मनात धुमसत होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच हत्येचा हा कट रचला. अखेर शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच आरोपींनी त्याचा काटा काढला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.