AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Hostel Murder Case : ‘ती सांगायची वॉचमन त्रास देतोय…’ मृत्यूपूर्वी मुलीला वाटत होती भीती

Mumbai Churchgate Girls Hostel Murder Case Updates : मुंबईतील चर्चगेट येथील मुलींच्या वसतिगृहाच्या खोलीत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलीच्या वडिलांनी रडत रडत काही नवे खुलासे केले.

Mumbai Hostel Murder Case : 'ती सांगायची वॉचमन त्रास देतोय...'  मृत्यूपूर्वी मुलीला वाटत होती भीती
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:54 AM

मुंबई : वॉचमन त्रास देतोय, अशी तक्रार ती सतत करत होती. तिचे आई-वडील आणि मैत्रिणीला हे माहीत होतं. पण तरीही हॉस्टेल प्रशासनानेन तिला चौथ्या मजल्यावर एकटंच ठेवलं. तिच्यासोबत कोणीही रूम-पार्टनर नव्हती. दोन दिवसांत परीक्षा संपल्यावर ती घरीच येईल, असा विचार तिच्या आई-वडिलांनी केला होता. पण आता ती कधीच घरी परू शकणार नाही…मुंबईच्या अतिशय हायप्रोफाईल आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात एका सरकारी वसतिगृहात 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि तिच्या हत्येची घटना (Mumbai Hostel Murder Case) घडली. हे दुष्कृत्य करणाऱ्या वॉचमननेही नंतर आत्महत्या केली.

मुंबईतील या घटनेमुळे अक्षरश: खळबळ उडाली आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला रडत रडत ही वेदनादायक कहाणी सांगितली. आपल्या मुलीला मुंबईच्या पंजाबराव देशमुख वसतिगृहात जागा मिळाली होती. पण तिथे मुलींसह मुलांची राहण्याची व्यवस्था असल्याने त्यांना ते सुरक्षित वाटले नाही आणि त्यांनी आपल्या मुलीला सावित्रीबाई फुले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवणे योग्य मानले.

हॉस्टेल प्रशासनाने हात वर केले, पोलिस तपास करतायत… पण आमचं जग उद्धवस्त झालंय

मृत मुलीचे वडील रडत रडत म्हणाले की, ‘वसतिगृह प्रशासनाने फक्त हात वर केले आहेत. माझ्या मुलीचा मृतदेह बाहेर पाठवला. आरोपी मृत झाला आहे. पोलीस आपले नियमित काम करत आहेत. आमची मुलगी गेली. आमचा संसार उध्वस्त झाला. एक लाखापेक्षा जास्त पगार घेणारे हे अधिकारी काय करतात ? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळू द्या. वसतिगृह प्रशासनाशी संबंधित लोकांना सहआरोपी करण्यात यावे.

वॉचमन 15-20 दिवसांपासून त्रास देत होता, सगळ्यांना माहीत होतं, पण तरीही…

‘ तो वॉचमन माझ्या मुलीला 15-20 दिवसांपासून त्रास देत होता. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. प्रकरण वाढू लागल्यावर तिने हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडमला सर्व प्रकार सांगितला. या गोष्टी तिने मलाही सांगितल्या. पण मी तिला म्हणालो जाऊ दे, आता तुझी सुट्टीच सुरू होणार आहे ना !

5 तारखेला शेवटचा पेपर होता, 6 तारखेला फोन उचलला नाही अन् ही बातमी मिळाली

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तिची शेवटची परीक्षा 5 जून रोजी होती. 8 तारखेला घरी परतण्याचे रिझर्व्हेशन होते. 5 तारखेला तिच्याशी बोलणं झालं. मात्र 6 तारखेला तिने फोन उचललाच नाही. नंतर तिच्या मैत्रिणीला फोन केला असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे तिने सांगितले. मात्र मुलगी वसतिगृहाच्या बाहेर गेली नाही. यानंतर मी वसतिगृह प्रमुखाला फोन केला असता त्यांनी पोलिसांना बोलवावे लागेल असे सांगितले. चौकीदारही सकाळपासून बेपत्ता होता, असेही तिच्या वडिलांनी सांगितले.

पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....