Bhandara Women Assault : महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिडीत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला. न्याय मिळण्याकरीता आम्ही सर्वपरीने कायदेशीर आम्ही मदत करणार अशी ग्वाहीही नीलमताईंनी दिली.

Bhandara Women Assault : महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 12:04 AM

नागपूर : भंडारा जिल्ह्यात येथील घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक (Arrest) केले असून एक जण फरार (Absconded) आहे. पीडित महिलेला या अत्याचारामुळे तीव्र जखम आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखी ही घटना असल्याचे स्पष्ट दिसत आहे. डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) यांनी पिडीत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला. न्याय मिळण्याकरीता आम्ही सर्वपरीने कायदेशीर आम्ही मदत करणार अशी ग्वाहीही नीलमताईंनी दिली.

रुग्णालयाच्या डीनशी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. नीलमताई गोऱ्हे यांनी पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता शिल्पा बोडखे आणि शिवसेना महिला आघाडी नागपूर महिला पदाधिकारी समवेत जाऊन भेट घेतली. नागपूर मेडीकल कॅालेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत पिडीत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिच्या सर्व उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. तसेच भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनीही या घटनेबद्दल अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही व्हावी याबाबत त्यांनीही पावले उचलली पाहिजे, असे नीलमताई पुढे म्हणाल्या.

गुन्हा गोंदिया पोलिसात वर्ग करण्यात आला

मदतीचे आश्वासन देऊन भंडाऱ्यात 36 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला होता. अत्याचारानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले. तिच्यावर नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदिया पोलिसांना वर्ग केला आहे. (Shiv Sena leader Neelam Gorhe met the family members of the victim woman in Bhandara)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.