बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष

बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पोलिसांनी पूर्ण केली असून, त्यांनी आपला अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना सादर केला आहे. ते आता यावर काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष
आमदार सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे.
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 2:40 PM

नाशिकः बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पोलिसांनी पूर्ण केली असून, त्यांनी आपला अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना सादर केला आहे. ते आता यावर काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे म्हटले होते. त्यामुळे साहजिकच एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले होते. यावर निकाळजे म्हणाले की, आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करणार आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले. माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही. कांदे विनाकारण पोलिसांची दिशाभूल करत आहेत. या प्रकरणी आम्हाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर अठरा दिवसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे.

कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ

पोलिसांच्या चौकदीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. निकाळजे यांनी कांदे यांना फोन केला होता. मात्र, तो कशासाठी, हे त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग नसल्याने ठोस सांगता आले नाही. शिवाय कांदे यांनाही फोन याच कारणासाठी आला होता, हे पटवून देता आले नाही. मात्र, यावेळी कांदे आपल्या दाव्यावर ठाम होते.

पाच व्यक्तींचे घेतले जबाब

चौकशीदरम्यान पोलिसांनी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे यांच्यासह पाच जणांचे जबाब नोंदवल्याचे समजते. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला असून, ते आता नेमका काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

धक्कादायकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेख

साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!

बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईची चित्त्यासारखी झडप; नाशिकमध्ये हिरकणीचा थरार!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.