VIDEO : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद

शिवसेनेच्या (ShivSena) दोन पदाधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपावरील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (ShivSena leaders beat Malad Rathodi Petrol Pump Employee)

VIDEO : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:57 AM

मुंबई : शिवसेनेच्या (ShivSena) दोन पदाधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपावरील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दोन व्यक्ती किती निघृणपणे दादागिरी करुन कर्मचाऱ्याला मारहाण करत आहेत ते या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या वादामागील कारण काहीही असू द्या, पण इतकं निघृणपणे वागणं अजिबात योग्य नाही. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचे किंवा सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी असाल तेव्हा तुम्ही जास्त संयमी राहणं जास्त आवश्यक असतं. मालाडच्या एका पेट्रोलपंपावरील या घटनेचा व्हिडीओ तुमचं मन विचलित करु शकतं (ShivSena leaders beat Malad Rathodi Petrol Pump Employee).

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही मालाडच्या राठोडी पेट्रोल पंपावर घडली. युवासेनेचे उपविभाग अधिकारी प्रदीप सोलंकी आणि शाखा समन्वयक निखील धनगरे हे पेट्रोल भरण्यासाठी आले. पेट्रोल पंपावर दाखल झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याला त्यांनी पेट्रोल भरण्यास सांगितलं. त्यांनी पेट्रोल भरल्यानंतर पैसे देण्यावरुन काहीतरी वाद झाला. या वादादरम्यान युवासेनेच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यास प्रचंड शिवीगाळ केली. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

पेट्रोलपंपावरील इतर कर्मचारी फक्त गंमत बघत राहिले

यावेळी पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी देखील बिथरले. त्यांच्यापैकी कुणाही आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी मध्यस्तीसाठी पुढे सरसावले नाही. फक्त एक वयस्कर सुरक्षा रक्षक व्यक्तीने मध्यस्ती केली. आपण मध्ये पडलो तर आपल्यालाही मारहाण होईल, या भीतीने इतर कर्मचारी या वादात पडले नाहीत. ते एका जागेवर थांबून घडत असलेला संपूर्ण प्रकार बघत राहिले.

कर्मचारी एकटा पडला

मारहाण करणाऱ्या आरोपींचा माज व्हिडीओत एकदम जसाचा तसा स्पष्टपणे दिसत आहे. या अशा प्रकारचे लोकं अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा माज जिरवण्यासाठी पोलिसांकडे तातडीने तक्रार करणं हाच त्यावरील रामबाण उपाय आहे. कारण आपण एकटे अशा लोकांसोबत लढू शकत नाही. कारण आपली शक्ती त्यांच्यासमोर कमी पडेल. तेच या पेट्रोलपंपावर घडलं.

पोलिसांकडून आरोपींना समज देवून सुटका

या मारहाणीनंतर संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत गेला. मालवणी पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची तक्रार गेली. पोलिसांनी युवासेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांना समज दिली आणि सोडून दिलं. मात्र, या घटनेमुळे मालाड परिसरात तणावाचे वातावरण होते.

घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

सोन्याच्या दागिन्यांसाठी कोयत्याने वार, हात तुटला; तृतीयपंथी गंभीर जखमी

मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक, 23.5 लाख लुटणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.