काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा

मुद्रा लोन मिळवून देते, असे आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या महिलेला शिवसेना महिला आघाडी आणि फसगत झालेल्या महिलांनी मिळून चांगला चोप दिला (Shivsena mahila aghadi beat congress women leader Shamim Bano).

काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:48 PM

कल्याण (ठाणे) : मुद्रा लोन मिळवून देते, असे आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या महिलेला शिवसेना महिला आघाडी आणि फसगत झालेल्या महिलांनी मिळून चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केलं. विशेष म्हणजे संबंधित महिला काँग्रेसची पदाधिकारी असून तिचं नाव शमीम बानो असं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शमीम बानोच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे (Shivsena mahila aghadi beat congress women leader Shamim Bano).

शमीम बानोकडून अनेकांना गंडा

कल्याणमध्ये राहणारी शमीम बानो नावाची एक महिला ही स्टॅम्प वेंडरचा काम करते. ती काँग्रेस पक्षाची पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामुळे अनेक महिला तिच्या संपर्कात येतात. तिने अनेकांना विविध प्रकारे गंडा घातला आहे. विशेष म्हणजे मुद्रा लोन मिळून देण्याचे आमिष दाखवून शमीमने अनेक महिलांकडून खूप पैसे उकळले आहेत. पण अखेर तिचं दुष्कृत्य महिलांच्या लक्षात आलं आहे.

शिवसेना महिला आघाडी शमीम बानोच्या भेटीला

लोन मिळाले नाही. तसेच गुंतवलेले पैसे मिळाले नाही म्हणून फसवणूक झालेल्या महिलांनी शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी आशा रसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या महिला शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत आज संध्याकाळी शमीम बानोला भेटण्यासाठी पोहोचल्या. सर्व महिला तिला विचारपूस करीत होत्या.

महिलांकडून शमीम बानोला चोप

दरम्यान, शमीम बानोने उलटसूलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त महिला आणि शिवसेना महिला आघाडीने शमीमला चांगला चोप दिला. एवढेच नाही तर तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली. महिलांनी शमीम बानो हिला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले (Shivsena mahila aghadi beat congress women leader Shamim Bano).

शमीम बानोवर याआधीही गुन्हे दाखल

विशेष म्हणजे शमीम बानो हिच्या विरोधात यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी सांगितले. फसवणूक झालेल्या महिलांची “त्यांचे पैसे लवकर मिळाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी”, अशी मागणी आहे.

हेही वाचा : माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील ‘त्या’ खुनाचा उलगडा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.