सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर सावधान! शहापूर पोलिसांची व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना नोटीस

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यात काही पोस्ट आक्षेपार्ह आहेत. मात्र, शहापूर पोलिसांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. शहापूर पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना नोटीस बजावली आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर सावधान! शहापूर पोलिसांची व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना नोटीस
WhatsApp
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 3:27 PM

शहापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही जोरदार राजकीय वारे वाहताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यात काही पोस्ट आक्षेपार्ह आहेत. मात्र, शहापूर पोलिसांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. शहापूर पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना नोटीस बजावली आहे. (Shahapur Police issues notice to WhatsApp group admin and members)

शहापुरात काल भाजपच्या एका कार्येकर्त्याने सोशल मीडियावर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तर शिवसेनेच्या एका कार्येकर्त्याने नारायण राणे यांच्याबद्दल कोंबडी चोर अशी पोस्ट व्हायरल केली. या संदर्भात दोन्ही पक्षाचे कार्येकर्ते एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात होते. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्येकर्त्यांची समोरासमोर भेट झाली आणि त्याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. या संदर्भात शहापूरमधील कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी आज शहापूर, वशिंद, किन्हवली, कसारा, खर्डी या सर्व पोलीस स्टेशनमार्फत सोशल मिडिया ग्रुप अँडमिन आणि ग्रुपमधील सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांमार्फत कुठलीही आक्षेपार्ह, राजकीय, धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये. अशा पोस्टमुळे जनतेच्या भावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहापूर पोलिसांनी दिला आहे.

नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यांच्याविरोधात म्हणजेच एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग काल केला गेला. या सगळ्यात कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. प्रसंगी त्यांना जेवणाच्या ताटावरुन उठवून गेलं, आम्ही या सगळ्याला करारा जवाब देऊ, असा आक्रमक पवित्रा नितेश राणेंनी घेतला.

‘मातोश्री’ला कोण जास्त खुश करत याची स्पर्धा लागलीय!

“मातोश्रीला कोण जास्त खुश करत याची स्पर्धा लागलेली आहे.आमदारांना मंत्री बनायचं आहे. मंत्र्यांना आपलं पद शाबूत ठेवायचं आहे.. त्यांनी राणेंवर टीका करायची. जशी ऑलम्पिकची स्पर्धा लागली आहे. आमच्यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होत असेल… त्यांना पद भेटत असतील तर आमचा त्यांना आशीर्वाद आहे”, असा टोला त्यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्षपणे राणेंना इशारा

सध्या राज्यात काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे, असं सांगतानाच जुने व्हायरसही परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला. सर्वांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणं पाहात असतात. मधल्या काळात तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी एक शब्द वापरला होता. रिव्हेंज टुरिझम. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. ते लक्षात आलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं. जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं नाही. आणि पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की पुन्हा हे संकट येऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली

अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले

Shivsena vs BJP Shahapur Police issues notice to WhatsApp group admin and members

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.