पुजाऱ्याचा गळा चिरून शिर काली मातेला अर्पण! काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड, महाराष्ट्रात की आणखी कुठे?

Murder News : ही घटना वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरली. त्यानंतर एकच घबराट उडाली होती.

पुजाऱ्याचा गळा चिरून शिर काली मातेला अर्पण! काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड, महाराष्ट्रात की आणखी कुठे?
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 10:09 AM

पुजाऱ्याची गळा चिरुन हत्या (Murder News) करण्यात आली. यानंतर त्याचं शिर काली मातेला अर्पण करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात देवीला कोंबडा किंवा बोकड दिलं जातं, तशाप्रकारे या पुजाऱ्याची हत्या करुन त्याला कालीमातेला चढवण्यात आलं. हे थरारक हत्याकांड महाराष्ट्रात नव्हे तर बिहारमध्ये (Bihar Crime News) घडलंय. बिहारच्या बेतिया जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Bihar Murder Mystery) गुन्हा दाखल घेतला असून आता तपासालाही सुरुवात करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना कळल्यानंतर संपूर्ण सगळेच सुन्न झालेत. काळजाचा थरकाप उडवणारं हे हत्याकांड बिहार राज्यातील बेतिया जिल्ह्या्मधील आहे. बेतिया जिल्ह्यातील गोपालूपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामजानकी मठीया बकुलहर इथं मंगळवारी रात्री हे हत्याकांड घडलं.

हत्येचा थरार

रुदल प्रसाद बरनवाल हे मंदिरात पुजाऱ्याचं काम करत. पण मारेकऱ्यांनी त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर ते पिपरा गावातील मंदिर असलेल्या काली मातेला चढवलं. हत्याकांड झालेलं मंदिर आणि पुजाऱ्याचं शिर ज्या ठिकाणी अर्पण केलं, ते काली मातेचं मंदिर अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही घटना वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरली. त्यानंतर एकच घबराट उडाली होती.

हे सुद्धा वाचा

मारेकऱ्यांचा शोध

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थली एक संशयास्पद चप्पल आढळून आली आहे. तर पुजाऱ्याची हत्या करण्यात आलेल्या परिसरात तणाव निर्माण झालाय. मारेकऱ्यांना पकडून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी लोकांकडून केली जातेय.

श्वान पथकाच्या मदतीने सध्या पोलिसांकडून हत्याकांडाचा तपास केला जातोय. बिहारच्या चनपटीया आणि गोपालपूर पोलिसांनी या हत्याकांडाची गंभीर दखल घेतली आहे. मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. या हत्याकांडामागे नेमकं कारण काय आहे, हे शोधणंही पोलिसांसमोरचं आव्हान आहे. मात्र अद्याप या हत्ये मागचं कारण स्पष्ट झालेलं असून पुजाऱ्याच्या हत्येवरुन उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.