‘तो तर काय… दुबळा आहे!’ असं गृहित धरुन एका व्यक्तीने समोर उभ्या असलेल्याच्या कानशिलात (Men Slapped) लगावली. यानंतर हाणामारी होईल की काय असं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पण ज्याला मारलं तो व्यक्ती बाहेर निघून जाताना दिसला. यानंतर सगळ्यांना हादरवणारं कृत्य या व्यक्तीने केलं. ज्याने कानशिलात लगावली होती, त्याला सगळ्यांसमोरच इतरांना दुबळ्या वाटलेल्या व्यक्तीने गोळ्या घातल्या. या खळबळजनक घटनेचा थरारक व्हिडीओ (LIVE Murder Video) समोर आला आहे. ही घटना सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाली आहे.
एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र सदर व्हिडीओ परदेशातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ही घटनादेखील नेमकी केव्हा घडली, तेही कळू समजू शकलेलं नाही. शिकागोमध्ये ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक सफेद रंगाचं टी शर्ट घातलेला व्यक्ती मागून येतो. समोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या एका व्यक्तीवर तो मागूनच प्रहार करतो. याने आजूबाजूचे इतर दोघेजणही धास्तावतात. भांडण वाढू नये म्हणून पुढे येतात. पण तितक्यात काळ्या कपड्यातील माणूस बाहेर निघून जातो. लोकांना वाटतं की मार खाऊन हा व्यक्ती गुपचूप निघून जातोय. पण बाहेर जाताना दरवाजापाशी येताच, हा व्यक्ती आपल्या बॅगमधून गन काढतो आणि आपल्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीवर थेट गोळीच झाडतो.
छातीवर गोळी लागल्याने सफेद रंगाच्या शर्टमधील व्यक्ती लगेचच जमिनीवर कोसळली होती. सगळ्यांची एकच घाबरगुंडी उडते. गोळी लागलेला व्यक्ती जमिनीवर विव्हळत असतो. तर गोळी मारुन काळ्या कपड्यातील मार खाल्लेली व्यक्ती तिथून पळून जाते.
डब्लूटीएफ मू्व्हमेन्ट्स या ट्वीटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चार सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओचं ड्युरेशन अवघं 40 सेकंद आहे. मात्र काळजाचा ठोका या 40 सेकंदांच्या व्हिडीओने चुकवलाय. अडीच लाखापेक्षा अधिक लोक आतापर्यंत हा व्हिडीओ पाहून झालेत. या व्हिडीओतील दृश्य विचलीत करणारी आहेत. या घटनेत ज्याने मारहाण केली तो, आणि ज्याने गोळी झाडली तो, या दोघांवरुन चर्चांना उधाण आलंय. कुणाचं बरोबर आणि कुणाचं चूक यावरुन कमेन्ट्सचा पाऊस या सोशल मीडिया पोस्टवर पडलाय.
या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.