धक्कादायक! डीएसपीची महिला कॉन्सटेबलसोबत अंघोळ, व्हिडीओत अश्लिल चाळे, तेही सहा वर्षाच्या मुलासमोर

प्रकरण पेटल्यानंतर महिला कॉन्सटेबलच्या पतीची तक्रार दाखल करुन घेऊन डीएसपीसहीत महिला कॉन्सटेबलवर रितसर कारवाई, चौकशी सुरु झालीय. सध्या दोघेही निलंबीत असून दोघांनाही संबंधीत कार्यालयात हजेरी लावण्यात आलीय.

धक्कादायक! डीएसपीची महिला कॉन्सटेबलसोबत अंघोळ, व्हिडीओत अश्लिल चाळे, तेही सहा वर्षाच्या मुलासमोर
Rajasthan DSP
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:15 PM

राजस्थान पोलीसांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी एक घटना समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ह्या व्हिडीओत एक डीएसपी एका महिला कॉन्सटेबलसोबत नग्न अंघोळ करत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ एका स्विमिंग पूलमधला आहे. विशेष म्हणजे दोघांचे अश्लिल चाळे सुरु असताना त्याच पूल मध्ये एक सहा वर्षाचा मुलगाही आहे. त्याच्यासमोर ह्या सगळ्या लीला सुरु होत्या. शेवटी राजस्थान पोलीसनं संबंधीत डीएसपी आणि महिला कॉन्सटेबलवर कारवाईचा बडगा उचललाय.

नेमकं काय आहे व्हिडीओत? 2 मिनिट 38 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. उदयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये हा व्हिडीओ शुट केल्याचं आता उघड झालंय. ह्या व्हिडीओत कथितपणे DSP हिरालाल सैनी आणि एक महिला कॉन्सटेबल एकत्र अंघोळ करताना दिसतायत. त्याच व्हिडीओत एक सहा वर्षाचा मुलगाही आहे जो त्यांच्याच बाजूला फुग्यासोबत खेळतोय. डीएसपी आणि महिला कॉन्सटेबल फक्त स्विमिंग पूलमध्ये पोहत असते तर कदाचित कुणी आक्षेप घेतला नसता पण त्या 6 वर्षाच्या मुलासमोर हे दोघेही नग्न अवस्थेत अश्लिल चाळे करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ह्या अश्लिल व्हिडीओवर राज्य बाल संरक्षण आयोगनं आक्षेप घेत कारवाईचे आदेश दिलेत. तीन दिवसात पोलीस अधिक्षकांना चौकशी रिपोर्ट दाखल करायला सांगितला गेलाय.

व्हिडीओ खरा की खोटा? 2018 पासून हिरालाल सैनी हे ब्यावरमध्ये पोलीस उपाधिक्षकपदावर तैनात आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली होती पण ती त्यांनी रद्द करुन घेतली. त्यानंतर ते आता ह्या नव्या अश्विल वादात सापडलेत. हिरालाल सैनी यांनी मात्र हा व्हिडीओ फेक असून एडीट करुन बनवल्याचा दावा केलाय. एवढच नाही तर व्हिडीओत दिसत असणारी महिला कोण आहे हे मी ओळखत नसल्याचही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे महिला कॉन्सटेबलनेही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलंय. पण संबंधीत महिला कॉन्सटेबलनं 13 जुलै 2021 ला स्विमिंग पूलमधलेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हॉटस अप स्टेटस म्हणून ठेवले होते. त्या व्हिडीओतही तो 6 वर्षांचा मुलगाही दिसत होता. पण आता हा दुसरा व्हिडीओ समोर आलाय आणि त्याला पार्ट 2 असं म्हटलं गेलंय.

डीएसपी आणि महिला कॉन्सटेबलवर कारवाई डीएसपी हिरालाल सैनी आणि त्या महिला कॉन्सटेबलला निलंबीत करण्यात आलंय. ते ज्या रिसॉर्टवर थांबले होते त्यावर छापा टाकून पोलीसांनी सैनीला ताब्यात घेतलं. त्यानंतर विभागीय चौकशी सुरु केली गेलीय. महिलेला मात्र अटक करण्यात आली नाही. तिच्यासोबत सहा वर्षाचा मुलगा असल्यामुळेच अटक झाली नसावी असा अंदाज आहे.

पतीची तक्रार महिला कॉन्सटेबलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या पतीनं पोलीसात तक्रार दाखल केलीय. तक्रारीत त्यानं म्हटलंय की, 2001 मध्ये त्याचं कुचामन सिटीतल्या एका मुलीशीही लग्न झालं. त्यानंतर तिला 2008 मध्ये राजस्थान पोलीसमध्ये नोकरी लागली. 2015 साली त्यांना एक मुलगाही झाला. हा तोच मुलगा आहे जो त्या अश्लिल व्हिडीओत दिसतो आहे. नवऱ्याच्या तक्रारीनुसार ह्या व्हिडीओमुळे त्याची आणि मुलाची बदनामी झालीय. याची तक्रार देण्यासाठी तो नागौरच्या पोलीस ठाण्यात गेला पण तिथं पोलीसांनी त्याची तक्रार दाखल करुन घेतली नाही. कारण प्रकरण डीएसपीशी संबंधीत होतं. पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश मीना यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. प्रकरण पेटल्यानंतर महिला कॉन्सटेबलच्या पतीची तक्रार दाखल करुन घेऊन डीएसपीसहीत महिला कॉन्सटेबलवर रितसर कारवाई, चौकशी सुरु झालीय. सध्या दोघेही निलंबीत असून दोघांनाही संबंधीत कार्यालयात हजेरी लावण्यात आलीय.

धक्कादायक! कोरोना काळात 4 ते 18 वयोगटातील 80% विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घटला; वाचा सर्व्हे काय सांगतो?

#क्राईम_किस्से : Amruta Deshpande | एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या, तेवीस वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी घटना

Ganesh Chaturthi 2021 | लालबागमध्ये पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.