Video: जत्रा पहायला गेलेल्या मुलींवर सरेआम लैंगिक अत्याचार! मध्य प्रदेशची टाळकं गरम करणारी घटना
Madhya Pradesh Shocking Video : एक मुलगा या मुलीला पकडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करताना दिसतो. तर दुसरा मुलगा त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असतो. दरम्यान, यानंतर आणखी काही मुलांचा घोळका हा सगळा प्रकार पाहून थांबतो.
मध्य प्रदेश : महिलांच्या सुरक्षेचा (Girls Safety) मुद्दा देशात आजही अत्यंत गंभीर आणि अनुत्तरीत असल्याची धक्कादायक बाब अधोरेखित झाली आहे. जत्रेमध्ये एका महिलेसोबत अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आलाय. ही घटना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यात घडली आहे. एका मुलीसोबत काही तरुणांनी अश्लिल लैंगिक (girl molestation) चाळे करत तिचा विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Shocking Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी तक्राराही दाखल करुन घेत चौकशी सुरु केली आहे. अलीराजपूर जिल्ह्यातील वालपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वालपूर गावात जत्रा बघण्यासाठी आलेल्या काही मुलींसोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. जत्रा बघायला आलेल्या मुलींसोबत अश्लिल वर्तन करत त्यांच्यावर भररस्त्यात जबरदस्ती करण्यात आली. यावेळी रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोकंही होती. काही मुलांनी कशाचीच भिडभाड न बाळगता, या मुलीवर हात टाकल्याचा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
व्हिडीओ समोर! नराधम मोकट..
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची चौकशी केली असून व्हिडीओच्या मदतीनंच आता मोकाट नराधमांचा शोधही पोलिसांनी सुरु केली आहे. सध्या याप्रकरणी शोधमोहीम पोलिसांकडून राबवली जाते आहे. लवकरच मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या या मोकाट नराधमांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा दावा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसलं?
शुक्रवारी संध्याकाळी हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. ट्रायबल आर्मी, या ट्वीटर अकाऊंटवरुन व्हायरल व्हिडीओ शेअर करत या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एका टेम्पोच्या शेजारी एका मुलीवर काही मुलांनी अतिप्रसंग केला. या मुलीचं लैंगिक शोषण करत तिचा विनयभंग करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.
एक मुलगा या मुलीला पकडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करताना दिसतो. तर दुसरा मुलगा त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असतो. दरम्यान, यानंतर आणखी काही मुलांचा घोळका हा सगळा प्रकार पाहून थांबतो. घोळक्यातील काही मुलं एका मुलाला मुलीच्या दिशेनं हुसकावत असल्याचं दिसलंय. त्यानंतर याच घोळक्यातील एक निळ्या रंगाचं शर्ट घातलेला मुलगा या मुलीसोबत गैरवर्तन करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ट्रायबर आर्मीनं शेअर केलेल्या या ट्वीटमध्ये पीडित मुलगी ही आदिवासी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धार या ठिकाणी राहणाऱ्या एका युवकानं हा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन इंटरनेटवर व्हायरल केल्याचं उघडकीस आलं आहे. आता या आदिवासी मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. मात्र या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाहा व्हिडीओ :
This video is from MP, India. tribal Women being sexually harassed & assaulted in full public view. This is horrifying. Such women are subjected to this daily, because they belong to the oppressed section of the society, Tribal. #TribalLivesMatterpic.twitter.com/vUein71imK
— Tribal Army (@TribalArmy) March 13, 2022
संबंधित बातम्या :
VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर GRPकडून गुन्हा
Beat coin scam: पुण्यात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले बिटकॉइन , नेमकं काय घडलं
सोलापुरात बारबालांवर पैशांची उधळण, ऑर्केस्ट्रा बारमधील 49 जणांवर कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त
इगतपुरीत दम मारो दम; पोलिसांचा रात्री 2 वाजता हुक्का पार्टीवर छापा, 70 जणांना बेड्या