जिथे श्रद्धा आफताब यांची ओळख झाली, ते Bumble App नेमकं वापरतात कसं?

Bumble Dating App वर पहिला मेसेज फक्त महिलाच करु शकतात, अशी सोय का करण्यात आली?

जिथे श्रद्धा आफताब यांची ओळख झाली, ते Bumble App नेमकं वापरतात कसं?
कसं वापरतात बंबल डेटिंग ऍप?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 12:23 PM

मुंबई : श्रद्धा वालकर या तरुणीची (Shraddha Walkar Murder News) आफताब पुनावाला या तिच्या लिव्ह ईन रिलेशनशिपमधील (Live in Relationship) पार्टनरनेच हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. तशी कबुलीही पोलीस चौकशीत त्याने दिल्याचं समोर आलंय. हत्याकांड घडल्याचा तब्बल 6 महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सगळेच हादरुन गेलेत. श्रद्धाचे आफताबने 35 तुकडे केले होते, असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या दोघांसोबत दिल्लीत नेमकं कशावरुन वाजलं आणि श्रद्धाची अत्यंत थंड डोक्याने हत्या करुन इतके दिवस आफताब मोकाट कसा राहिला, यावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. या सगळ्याचा गुंता सोडवण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं असतानाच तपासातून काही गोष्टींचे खुलासे झालेत. श्रद्धा आणि आफताब ज्या डेटिंग ऍपवर एकमेकांच्या संपर्कात आले, त्या डेटिंग ऍपचीही (Bumble Dating App) आता चर्चा रंगलीय.

आफताब आणि श्रद्धा हे दोघेही मूळचे वसईचे. या दोघांचीही ओळख ज्या डेटिंग ऍपवर झाली, त्याचं नाव आहे बंबल डेटिंग ऍप. भारतात टिंडर या डेटिंग ऍपचा जसा वापर प्रचलित आहे, तसाच बंबल ऍपचाही वापर मोठ्या प्रमाणात जगभरात केला जातो.

जवळपास 1 कोटी लोकांनी हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केलंय. ऍपस्टोअर वर देखील बंबल डेटिंग ऍप उपलब्ध आहे. तिथेही या ऍपडे असंख्य डाऊनलोड्स झाल्याची आकडेवारी दिसून आली आहे. टिंडर प्रमाणे बंबल डेटिंग ऍप काम करतं.

टिडर डेटिंग ऍपला पर्याय म्हणून अनेकजण बंबल डेटिंग ऍपकडे वळले. हे ऍप 2014 साली लॉन्च झाली. अमेरिकेत या ऍपची निर्मिती करण्यात आलीय. एका अमेरिकन कंपनीच्या मालकीचंच हे ऍप आहे. व्यावसायिक व्हिटनी बोल्फ हर्ड हे ऍप तयार केलं. तरुण तरुणींना आपला पार्टनर शोधण्याच्या प्रमुख उद्देशापोटी या ऍपची निर्मिती करण्यात आली होती.

या ऍपची खास बात म्हणजे हे ऍप वापरायला टिंडर सारखंच आहे. इतर ऍप्सप्रमाणे बंबल मध्ये आधी युजर प्रोफाईल क्रिएट करावी लागते. त्यानंतर पुढील गोष्टी करता येतात.

टिंडर प्रमाणेच राईट स्वाईप करुन या ऍपमध्ये नेटवर्किंग करता येतं. विशेष म्हणजे या ऍपमध्ये तीन मोड्स देण्यात आलेत. त्यात डेटिंग मोड, फ्रेन्डशिप मोड आणि बिझनेस मोड अशी 3 वर्गवारी करण्यात आलीय.

बंबल ऍपची आणखी एक खासियत म्हणजे या ऍपमध्ये राईट स्वाईप करुन तुम्ही आपल्या मॅचप्रमाणे नेटवर्किंग तर करु शकता. पण या ऍपमध्ये चॅटिंग करायचं असेल, तर मात्र तरुणांना आधी सुरुवात करता येत नाही.

बंबल डेटिंग ऍपमध्ये पहिला मेसेज हा मुलीच पाठवू शकतात, अशी सोय करण्यात आलेली आहे. आता असं नेमकं का करण्यात आलंय? यावरुन वादंग होऊ शकतो. पण फिमेल युजरलाच बंबल ऍपमध्ये पहिला मेसेज करण्याची मुभा देण्यात आलीय.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.