श्रद्धा वॉल्करसारखं हत्याकांड, गर्लफ्रेंडला मारुन जंगलात फेकलं, 3 महिन्यानंतर असं समोर आलं सत्य
2017-18 साली मोबाइल फोनमुळे त्याची ओळख शहनूर बरोबर झाली. त्यानंतर दोघे परस्पराच्या संपर्कात होते. सप्टेंबर 2023 मध्ये शहनूरला भेटण्यासाठी तो डेहराडूनला आला. त्याने संस्कृती लोक कॉलनी आयएसबीटी येथे एक रुम भाड्यावर घेतली.
श्रद्धा वॉल्कर हत्याकांडासारख प्रकरण समोर आलय. लिव-इन- रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवतीची तिच्याच प्रियकराने अत्यंत क्रूरतेने हत्या केली. तिचा मृतदेह बॅगेमध्ये भरुन ती सूटकेस जंगलात फेकली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केलीय. आरोपीने तीन महिने आधी डिसेंबर 2023 मध्ये ही हत्या केली होती. उत्तराखंडच्या डेहराडूनमधली ही घटना आहे. 29 जानेवारीला हरिव्दारच्या पटेलनगरमध्ये शहरुल नावाच्या महिलेने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मागच्या अनेक दिवसांपासून 24 वर्षांची शहनूर बेपत्ता असल्याच तिने तक्रारीत म्हटलं होतं.
अनेक दिवस मुलीचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांना डेहराडूनच्या आशारोड़ी जंगलात सूटकेस मिळाली. त्यातून खूप दुर्गंधी येत होती. पोलिसांनी सूटकेस उघडली तेव्हा त्यांना कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवण खूप कठीण होतं. पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन केलं. त्यावेळी मृतदेह हरिद्वारच्या पटेलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेल्या बेपत्ता मुलीचा असल्याच समजलं.
पोलिसांनी राशिदला कशी अटक केली?
डेहराडून आणि हरिद्वार पोलिसांनी मिळून तपास केला, तेव्हा समजलं की, 23 वर्षाच्या राशिदने हे हत्याकांड घडवलय. पोलीस राशिदचा शोध घेत होते, एकदिवस त्यांना समजलं की, राशिद संस्कृती लोक कॉलोनी येथील आपल्या घरी येणार आहे. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. चौकशी सुरु केल्यानंतर राशिद तुटला. त्याने पोलिसांसमोर आपल्या गुन्हायाची कबुली दिली.
प्रेम संबंध कसे तयार झाले?
राशिदने पोलिसांना सांगितलं की, तो बागोवाली येथे मोटरसायकल रिपेयरिंगच काम करतो. 2017-18 साली मोबाइल फोनमुळे त्याची ओळख शहनूर बरोबर झाली. त्यानंतर दोघे परस्पराच्या संपर्कात होते. सप्टेंबर 2023 मध्ये शहनूरला भेटण्यासाठी तो डेहराडूनला आला. त्याने संस्कृती लोक कॉलनी आयएसबीटी येथे एक रुम भाड्यावर घेतली. दोघे एकत्र राहू लागले.
त्याच्या कानाखाली मारली
शहनूरने त्याला सांगितलेलं की, ती ब्युटी पार्लरमध्ये काम करते. पण पत्ता विचारल्यानंतर नेहमीच ती विषय टाळायची. शहनूर अनेकदा रात्री उशिरा किंवा दुसऱ्यादिवशी रुमवर यायची. त्यामुळे शहनूरचे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत असा राशिदच्या मनात संशय निर्माण झाला. 27 डिसेंबरला ती जेव्हा रुमवर आली, त्यावेळी दोघांमध्ये यावरुन जोरदार वादावादी झाली. भांडणामध्ये शहनूरने त्याच्या कानाखाली मारली. त्या रागातून संतापलेल्या राशिदने शहनूरची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर राशिदने तिचा मृतदेह बॅगेत भरला व ती बॅग जंगलात फेकून दिली.