Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आफताब नावाच्या विकृतीमागे कोण कोण? श्रद्धा वालकर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा, कुणी केली मागणी?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी दिल्ली पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.

आफताब नावाच्या विकृतीमागे कोण कोण? श्रद्धा वालकर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा, कुणी केली मागणी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 12:43 PM

विजय गायकवाडः श्रद्धा वालकरची (Sharddha Walkar) अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आफताब (Aftab) या नावामागे खूप मोठी विकृती आहे. एका तरुणाची किंवा प्रियकराची ही वृत्ती असूच शकत नाही. मग या विकृतीमागे नेमके कोण लोक आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आफताब नेमक्या कोणत्या मिशनसोबत जोडला गेला आहे? ते टेररिझम (Terrorism) आहे का एखादं धार्मिक मिशन आहे, या संबंधी चौकशी सीबीआयमार्फत झाली पाहिजे. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे, अशी मागणी श्रद्धाच्या मित्रांनी केली आहे.

श्रद्धा वॉकर हिचा कॉलेजमधील मित्र रजत शुक्ला याने ही मागणी केली आहे. तर श्रद्धा वॉकर हत्याकांड प्रकरणी आता महिला आयोगदेखील आक्रमक झाला आहे.

श्रद्धा वॉकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे.

मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. मात्र हत्या झाली हे दाखवणारे सशक्त पुरावे आणि दोषारोप सिद्ध करणे हे मोठं आव्हान आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. राज्य महिला आयोग या घटनेचा सातत्याने पाठपुरावा करेल, असेही चाकणकर यांनी सांगितलं.

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी दिल्ली पोलिसांतर्फे करण्यात आली आहे. श्रद्धाच्या खात्यातून आफताबने 54 हजार रुपये आपल्या खात्यात वळवले होते. या सगळ्या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही मागणी केली आहे.

28 वर्षांचा आफताब पुनावाला आणि 26 वर्षांची श्रद्धा वालकर हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचं उघड झालं. फक्त खून करून आफताब थांबला नाही तर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केलं.

तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते एका पिशवीत टाकले. नंतर 300 लीटरचे फ्रीज घेतले. त्यात हे तुकडे ठेवले. दररोज तो श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकत होता.

18 मे रोजी श्रद्धाचा खून झाला. पण ती जिवंत आहे, हे भासवण्यासाठी आफताबने तिचं सोशल मीडिया अकाउंट सुरु ठेवलं होतं. तसेच डेटिंग अॅपही अपटेड ठेवत होता.

सप्टेंबर महिन्यात श्रद्धाच्या मैत्रिणीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न झाल्याने तिच्या भावाला कळवण्यात आलं. त्यानंतर या हत्याकांडाचा खुलासा होत गेला.

न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.