सिद्धू मुसेवालाचा पुण्यातील एक मारेकरी अवघ्या 23 वर्षांचा. संतोष जाधवची आई म्हणते.. मी मुलाला पाठिशी घालणारी नाही

कुणी गुन्हेगार होत नाही, त्याच्याबाबत काही गोष्टी घडतात तेव्हाच तो गुन्हेगार होते, असे त्याची आई सांगते. एका बाजूला हेच सांगणाऱ्या सीता जाधव जर संतोष दोषी असेल तर त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, असा सल्लाही संतोषला देतायेत

सिद्धू मुसेवालाचा पुण्यातील एक मारेकरी अवघ्या 23 वर्षांचा. संतोष जाधवची आई म्हणते.. मी मुलाला पाठिशी घालणारी नाही
Gangster Santosh Jadhav motherImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 7:37 PM

पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या दिवसाढवळ्या झोलेल्या हत्येनं सगळा देश हादरला. या हत्याकांडानं पंजाबमधील राजकारण ढवळलं गेलं, तर पंजाबातील गँगस्टर्स पुन्हा सक्रिय झाले. या हत्याकांडाचा महाराष्ट्राशी काही संबंध असेल असे कुणालाच वाटलं नव्हतं. या प्रकरणात पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई, कॅनडातील गोल्ही ब्रार यांची नावे चर्चेत होती. पण आता पोलिासंच्या तपासात वेगळंच वास्तव समोर आले आहे. ज्या आठ हल्लेखोरांनी पंजाब राज्यात मनसामध्ये सिदधू मुसेवाला याची गाडवली, आणि त्याला 2 मिनिटांत 30 गोळ्या घातल्या. त्या आठ हल्लेखोरांची नावं समोर आली आहेत. त्यातील दोन मारेकरी हे महाराष्ट्रातले तसचं पुणे जिल्ह्यातले असल्याचं स्पष्ट झालं आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघांची नावं आहेत. त्यातील संतोष जाधव हा मंचरचा राहणारा आहे. मंचरचा सराईत गु्नेहगार असलेल्या ओंकार बाणखेले प्रकरणातील खुनाचा तो आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राईम ब्रँच त्याच्या शोधात आहे. पुणे जिल्ह्यात मंचरमध्ये त्याची आई राहते. तर त्याची पत्नी कोल्हापूर येथे असल्याचे माहिती आहे.

संतोषची आई म्हणते..

संतोष जाधवचे वय अवघे 23 वर्षांचे आहे. संतोष एवढा मोठा शूटर होऊ शकत नाही असे त्याची आई सीता जाधव यांनी सांगितले आहे. पोलिसांनी फक्त त्याने हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याचं त्याच्या आईला वाटते आहे. त्याचे नाव या प्रकरणात गोवले गेले असेल असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. कुणी गुन्हेगार होत नाही, त्याच्याबाबत काही गोष्टी घडतात तेव्हाच तो गुन्हेगार होते, असे त्याची आई सांगते. एका बाजूला हेच सांगणाऱ्या सीता जाधव जर संतोष दोषी असेल तर त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, असा सल्लाही संतोषला देतायेत. चुकीचं काही केले असेल तर त्याची शिक्षा भोगून ये, असेही त्या संतोषला सांगतायेत. मुलाला पाठिशी घालणार नाही, असेही सीता जाधव यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

संतोष जाधववर 4 गुन्हे दाखल

संतोष जाधववर मंचरमध्ये चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल शेळके यांनी दिली आहे. एका खुनाच्या प्रकरणानंतर संतोष फरार आहे. 2021 पासून संतोष राजस्थान, हरियाणा, पंजाब या भागांमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. याच काळात त्याचा लॉरेन्स गँगशी संपर्क आल्याची शक्यता पोलिासंनी वर्तवली आहे. त्याला शोधण्यासाठी पोलीस पथक राजस्थान बॉर्डरपर्यंत जाऊन तपास करून अल्याचेही त्यांनी सांगितले. पण संतोष अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संतोष आधी बालगुन्हेगारांसोबत सोबत काम करत होता, नंतरही बालगुन्हेगारांना हाताला धरून काम करत राहिला असेही पोलिसांनी सांगितले आहे. संतोषने पंजाब, हरियाणा या भागांमध्ये काही गुन्हे केल्याची माहितीही पोलिसांकडे आहे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.