Sikkim Accident : सिक्कीममध्ये ठाण्यातल्या 5 जणांचा अपघातात मृत्यू, सिक्कीमधील ड्रायव्हरसह एकूण मृतांचा आकडा 6 वर
ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे चार सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (28 मे) विमानाने सिक्कीमला गेले. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. मात्र, प्रवास ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला.
सिक्कीम : अपघात (Accident) ही अशी गोष्ट आहे जी एका क्षणात आपलं सर्व काही हिरावून घेते. अनेक कुटुंबच्या कुटुंब अशा अपघातात (Car Accident) गेली आहे. आता पुन्हा असाच एक अपघात आज सिक्कीमध्ये घडलाय. कारण सिक्कीममध्ये (Sikkim Accident) गेलेल्या ठाण्यातील नागरिकांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. यात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चौघांपैकी एक जवळील व्यक्ती असून 6 वा व्यक्ती सिक्कीम येथील कार चालक आहे . ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे चार सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (28 मे) विमानाने सिक्कीमला गेले. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. मात्र, प्रवास ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील कार चालक ही सहावी व्यक्तींअसून त्याचा मृत्यू झाला. मागील 15 वर्षापासून हे कुटुंब ठाण्यात राहत होतं.
एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
याच एकाच कुटुंबातील चार जण या अपघातात गेल्याने संपूर्ण परिवारच गेल्यासारखं झालंय. त्यामुळे जास्त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघात एकाच कुटुंबातील चार जण जे मृत पावले आहेत. त्यांची नावंही समोर आली आहेत.
एका कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे
1-सुरेश पूनामिया -पती 2-तोराल पूनामिय-पत्नी 3-हिरल पुनामिया -मुलगी 4-देवांशी पूनमिया -मुलगी
उद्या मृतदेह ठाण्यात आणण्याची शक्यता
ठाण्यातील या मृतांचे मृतदेह उद्या ठाण्यात आणण्याची शक्यता आहे. त्यांचे कुटुंबिय तसेच नातेवाईक या भीषण अपघाताने शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खा डोंगरच कोसळला आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून यात अजूनही काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कार दरीत कोसळण्याच्या घटना वाढल्या
अलिकडे करा दरीत कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याचे वाहनही दरीत कोसळून 7 जणांची घटना ही लडाखमधील ताजी असताना आता सिक्कीमध्येही असाच प्रकार घडला आहे. लडाखमधील अपघातात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्यावर आजच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अशातच आता ठाण्यातले 5 जण अशाच पद्धतीने गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. डोंगरदऱ्यांच्या भागात अनेकदा चालकाला घाटाचा आणि वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळेच असे अनर्थ घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे घाटात गाडी चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.