‘सैराट’पेक्षा ही भयंकर शेवट, मेव्हण्याने भाऊजीला असं संपवलं की शहर हादरलं
इटावा रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटवर, जिथे दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात, शनिवारी एक भयानक घटना घडली. स्टेशनजवळील चहाच्या टपऱ्यावर बसलेल्या मोनूची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर भरपूर गाजला होता. सिनेमाची आजही चर्चा होते. या सिनेमात दाखवलेला शेवट अंगावर शहारा आणणारा आहे. सिनेमात दाखवलेली गोष्ट अनेक ठिकाणी खरी ठरली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटावा रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटवर जिथे हजारो प्रवासी येत जात असतात. त्या ठिकाणी शनिवारी एक भयानक घटना घडली. चहाच्या टपरीवर बसलेल्या मोनूची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं.
मोनू हा त्याचा मेहुणा जितेंद्रच्या निमंत्रणावरून रेल्वे स्टेशनजवळ चहा आणि मॅगी घ्यायला गेला होता. पण ही भेट शेवटची ठरेल असा विचार देखील मोनूने केला नसेल. मेहुणा जितेंद्र मौर्याने कटाचा भाग म्हणून मोनूला तिकडे बोलावले होते. दीड वर्ष जुन्या प्रेमकथेशी ही घटना संबंधित आहे. मोनू जितेंद्रच्या बहिणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. पण मोनूच्या घरच्यांना हे नातं आवडलं नाही आणि हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने हा विवाह अवैध ठरवला. तेव्हापासून मोनू आणि जितेंद्र यांच्यात शत्रूत्व वाढलं होतं.
चहा आणि मॅगी खाण्याच्या नावाने मृत्यूचा सापळा
शनिवारी दुपारी जितेंद्र याने मोनूला चहा आणि मॅगीच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्याने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. ही घटना रेल्वे स्थानक आणि जीआरपी पोलिस स्टेशनच्या मुख्य गेटपासून अवघ्या 20 पावलांच्या अंतरावर घडली, जिथे गर्दीमध्ये जितेंद्रने आपल्या मेव्हण्याला भोसकून ठार केले. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी जितेंद्रला अटक केली.
⚠️Sensitive Video⚠️
उत्तर प्रदेश के जिला इटावा में रेलवे स्टेशन के बाहर जीजा ने नीरज मौर्या ने साले मोनू यादव की हत्या कर दी। उसको करीब 8 बार चाकू से गोदा। फिर लाश को घसीटता हुआ ले गया।
नीरज ने मोनू की बहन से लव मैरिज की। कोर्ट ने ये शादी अवैध घोषित कर दी। बाद में मोनू ने बहन… pic.twitter.com/of7mToIISf
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 31, 2024
घटनेची माहिती मिळताच एसएसपी आणि फॉरेन्सिक टीमसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या हत्येने इटावा रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. प्रेमकथेची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. या घटनेने स्टेशनवर ये-जा करणाऱ्या लोकांना धक्काच बसला नाही तर प्रेमातून निर्माण होणारे वैर किती घातक ठरू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.