सांगली रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण, चार संशयितांची रेखाचित्रे जारी
सांगलीत रिलायन्स ज्वेल्स या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली होती. यानंतर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून वेगात तपास सुरु आहे.
सांगली : रिलायन्स ज्वेल्समधील भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोडामधील चार संशयित दरोड्याखोरांचे रेखाचित्र सांगली पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी ही माहिती दिली. या दरोड्यात 14 कोटींच्या सोने-डायमंड लूट आणि 67 हजाराची दरोड्याखोरांकडून लूट करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत दरोडेखोरांनी वापरलेली कार जप्त केली आहे. आज या कारमधील वस्तूची कोल्हापूरच्या टीमकडून फॉरेन्सिक लॅबकडून नमुने घेण्यात आले. याचबरोबर आज यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आली.
संशयितांची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन
या रेखा चित्रातील संशयतांची माहिती कोणास असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेवली जातीस, असे आवाहनही पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे. दरम्यान, रिलायन्स दरोडा प्रकरणी सांगली पोलिसांनी हैदराबाद येथून सहा संशयित ताब्यात घेतल्याची माहिती आहे. लवकरच या संशयतांना सांगलीमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे.
दरोड्यानंतर शेतात वाहन सोडून पळाले
दरोडा टाकल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले चारचाकी सफारी वाहन भोसे गावातील शेतात टाकून दरोडेखोर फरार झाले होते. दोन रिवाल्वरही पोलिसांनी जप्त केले. दरोडेखोरांची महत्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. भोसे वस्ती येथील संजय चव्हाण यांच्या शेताच्या बांधावर गाडी आढळून आली होती.
या ठिकाणी मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एलसीबी पथक, जिल्हयातील पोलीस फौज फाटा तात्काळ दाखल झाला होता. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली.