पाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं
दोन कर्मचाऱ्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेतल्याची प्रकार समोर आला आहे. (Solapur Two People arrested In Bribe Case)
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील विभागीय कार्यालयामधील दोन कर्मचाऱ्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेतल्याची प्रकार समोर आला आहे. ही लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं आहे. यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. (Solapur Anti Corruption Department arrest Two People In Bribe Case)
याप्रकरणी तक्रारदार हा सोलापुरातील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय येथे विवाह नोंदणीसाठी गेला होता. मात्र विवाह नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणचे कर्मचारी सल्लाहुद्दीन शेख आणि वरिष्ठ मनोज पाटोले यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.
पण तक्रारदाराने दीड हजार देण्याचे कबूल केले. पण विवाह नोंदणीवेळी 1 हजार रुपयांची लाच स्विकारली होती. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा पाचशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. यानंतर या विभागाने सापळा लावून दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले.(Solapur Anti Corruption Department arrest Two People In Bribe Case)
टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान!#TeamIndia #SunrisersHyderabad https://t.co/88wt44YITy
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या :
Dhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम !
श्रीकांत शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत?