31 डिसेंबरला पोटच्या गोळ्याने आत्महत्या केली, तीन महिन्यांनी तिथेच माऊलीनेही आयुष्य संपवलं
मुलाच्या आत्महत्येनंतर 40 वर्षीय शारा भीमराव कोळी यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती आहे (Solapur Mother Suicide where son ended life)
सोलापूर : ज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली होती, त्याच ठिकाणी आईनेही आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोलापुरातील गणपती घाट भागात 31 डिसेंबरला तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तीनच महिन्यात त्याच्या माऊलीनेही तिथेच जीव दिला. (Solapur Mother commits Suicide at Ganapati Ghat Lake where son ended life three months ago)
तलावात महिलेचा मृतदेह सापडला
सोलापूर शहरात गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात एका अज्ञात महिलेच्या मृतदेह मिळाला होता. बसवराज कोळी हे सकाळी नेहमीप्रमाणे गणपती घाट येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना तलावात महिलेचा तरंगणारा मृतदेह आढळला.
गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात महिलेने आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं. त्यामुळे कोळी यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी फौजदार पोलीस दाखल झाल्यानंतर अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
31 डिसेंबरला महिलेच्या मुलाची आत्महत्या
40 वर्षीय मृत महिलेचे नाव शारा भीमराव कोळी असल्याचे समोर आले. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या. त्यानंतर पुढे समजलेल्या माहितीने सर्वच जण हैराण झाले. 31 डिसेंबर रोजी शारा कोळी यांच्या मुलाने गणपती घाट भागातच आत्महत्या केली होती.
महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती
मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर शारा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. अखेर, त्याच ठिकाणी शारा कोळी यांनी आपलं जीवन संपवलं. या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या घटना विचारात घेऊन आता तलावाला संरक्षक जाळी अथवा भिंती बसवण्यात यावी अशी मागणी होत आहे.
संबंधित बातम्या :
झोपलेल्या सावत्र आईवर कुऱ्हाडीचे वार, हत्येप्रकरणी सांगलीत मुलाला अटक
पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप, माजी आमदाराच्या पॅरोलवर सुटलेल्या मुलाचा गळफास
कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास
(Solapur Mother commits Suicide at Ganapati Ghat Lake where son ended life three months ago)