धावत्या एसटीत आत्महत्येचा प्रयत्न! सोलापूरहून उस्मानाबादला निघालेली एसटी कंडक्टरने थेट रुग्णालयात आणली…

Solapur News : शंका आल्यानंतर कंडक्टरने मागे पाहिल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी हे उलट्या करीत असून त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आले.

धावत्या एसटीत आत्महत्येचा प्रयत्न! सोलापूरहून उस्मानाबादला निघालेली एसटी कंडक्टरने थेट रुग्णालयात आणली...
थोडक्याच वाचला...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 2:21 PM

सोलापूर : धावत्या एसटीमध्ये एका प्रवाशानं आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. या प्रवाशाचे प्राण वाचवण्यात यश आलंय. कंटक्टर आणि चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचलाय. धावत्या एसटीमध्ये (ST Bus) एका प्रवाशानं विष प्राशन केलं. त्यानंतर एसटीमध्ये (Solapur News) विषारी औषधाचा वास येऊ लागल्यानं कंडक्टरसह प्रवाशांनाही शंका आली. काही वेळानं एक प्रवासी कासावीस झाल्याचं दिसून आलं. चकीत करणारी गोष्ट म्हणजे एसटी बसमध्ये मागच्या सीटवर जाऊन हा प्रवासी बसला होता. वेळीच या रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे हा प्रवासी थोडक्यात बचावल्या. एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानांचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

तोंडातून फेस आल्यानंतर घाबरगुंडी

कराडहून उस्मानाबादकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशाने एसटीतच विषषप्राशन केलं. कराडवरुन आलेल्या एसटीत सोलापूरमधून सिद्धेश्वर स्वामी नामक प्रवासी चढला. त्यानंतर त्याने तिकीट काढलं आणि एसटीच्या शेवटच्या सीटवर जाऊन बसला. काहीवेळाने एसटी सोलापूरमधून निघाल्यानंतर विषारी औषधाचा वास सुरू झाला.

शंका आल्यानंतर कंडक्टरने मागे पाहिल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी हे उलट्या करीत असून त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कंडक्टरने एसटी थेट सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या दिशेने वळवली आणि प्रवाशाला रुग्णालयात नेलं. तातडीनं प्रवाशाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. विष प्राशन केलेल्या प्रवाशावर उपचार सुरू असून कंडक्टरने वेळेत रुग्णालयात प्रवाशाला दाखल केल्याने प्रवाशाचे प्राण वाचलेत. दरम्यान, याप्रवाशाने आत्महत्या करण्याच प्रयत्न का केला, हे कळू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

सोलापूरहून तीन किलोमीटर लांब गाडी आल्यानंतर गाडी वास येऊ लागला होता. त्यामुळे कंडक्टर संजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णाहिकाही बोलवण्यात आली होती. पण रुग्णाला गाडीतून उतरवण्यात अडचणी असल्याचं लक्षात येताच एसटी मागे आणि रुग्णवाहिका पुढे असा प्रवास करत प्रवाशाला सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलं. कंडक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवासी थोडक्यात बचावलाय. सध्या या प्रवाशावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.