कधी नेता, कधी न्यायाधीश, कधी मोठा अधिकारी सांगून फसवणूक; कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंद्रशेखरचा आलिशान बंगला, 82.5 लाख रोख आणि डझनभर महागड्या कार जप्त केल्या होत्या. चंद्रशेखरवर तिहार जेलमधूनच 200 कोटी रुपयांचे वसुली रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.

कधी नेता, कधी न्यायाधीश, कधी मोठा अधिकारी सांगून फसवणूक; कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
Sukesh Chandrasekhar
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 2:21 PM

नवी दिल्ली : तिहार कारागृहात बंदिस्त असलेला सुकेश चंद्रशेखरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेय. स्वतःला राजकारण्यांचे नातेवाईक, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, मंत्रालयांचा वरिष्ठ अधिकारी असे सांगून श्रीमंतांकडून सुकेशनं बरेच पैसे उकळलेत. ईडीने सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी बोलावले. त्याचवेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्नांडिसही चंद्रशेखरच्या फसवणुकीची बळी ठरलीय आणि या प्रकरणात साक्षीदार म्हणून तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंद्रशेखरचा आलिशान बंगला, 82.5 लाख रोख आणि डझनभर महागड्या कार जप्त केल्या होत्या. चंद्रशेखरवर तिहार जेलमधूनच 200 कोटी रुपयांचे वसुली रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

बंगळुरू, कर्नाटकचा रहिवासी चंद्रशेखर याने अवघ्या 17 व्या वर्षी लोकांना फसवणे सुरू केले. त्याने आपली ही गंडा घालण्याची योजना बंगळुरूपासून सुरू केली आणि काही वेळातच तो चेन्नईला पोहोचला. यानंतर त्याने मोठ्या शहरांमधील अनेक श्रीमंत लोकांची फसवणूक केली. चंद्रशेखरला बालाजी म्हणूनही ओळखले जाते. नोकरी देण्याच्या नावाखाली त्याने अनेक लोकांकडून पैसे उकळले. त्याने आपले राजकारणी नातेवाईक असल्याचे भासवून 100 पेक्षा जास्त लोकांची 75 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे.

चंद्रशेखर याच्यावर गुन्हे दाखल

2017 मध्ये चंद्रशेखरला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आणि निवडणूक आयोगानं लाचप्रकरणी त्याला तिहार जेलमध्ये पाठवले. निवडणूक चिन्ह देण्याच्या नावाखाली त्याने AIADMK (अम्मा) नेते टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होता. अण्णाद्रमुक (अम्मा) गटासाठी निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी त्याने 50 कोटी रुपयांचा सौदा केल्याचे सांगितले जाते. अटकेच्या वेळी त्याच्याकडून 1.3 कोटी रुपये कथितपणे वसूल करण्यात आले होते. तिहार कारागृहात ठेवल्यानंतरही तो लॉकअपमधून करोडो रुपयांच्या वसुलीचे रॅकेट चालवत आहे.

खंडणीचे रॅकेट कसे उघड झाले?

ईडीच्या सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था आयएएनएसने सांगितले की, फोर्टिसचे प्रवर्तक शिविंदर सिंग यांच्या पत्नी अदिती एस सिंग यांच्या तक्रारीवरून हा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. तिने 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा आरोप केला. ती म्हणाली की, फोन करणाऱ्याने स्वत: ला कायदा मंत्रालयाचा अधिकारी म्हणून ओळख दिली होती आणि तिच्या पतीला जामीन देण्याचे आश्वासन दिले होते. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अदिती सिंगच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, या प्रकरणाच्या तपासानंतर असे आढळून आले की, यामागील सूत्रधार सुकेश चंद्रशेखर आहे.

जॅकलिन फर्नांडिसचे नाव आले समोर

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सोमवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली. एनडीटीव्हीच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, फर्नांडिसदेखील या रॅकेटचा बळी ठरलीय. 36 वर्षीय अभिनेत्री रॅकेटचा कथित मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखरच्या रडारखाली आल्याची माहिती ईडीच्या सूत्रांना मिळाली. या कामात त्याची भागीदार लीना पॉलने त्याला मदत केली. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “ती आरोपी नाही, पण घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार म्हणून तिचा जबाब घेतला जात आहे.” बॉलीवूडचे अनेक मोठे तारे चंद्रशेखरच्या निशाण्यावर असल्याचे तपासातून समोर आले.

संबंधित बातम्या

40 वर्षीय डॉक्टरचा महिलेवर जीव जडला, फोटो व्हायरल झाल्याने बोभाटा, बेदम मारहाण करुन जीव घेतला

फेसबुक लाईव्हमध्ये मित्रांना म्हणाला ‘प्रेम-बिम सोडा’, प्रेयसीला म्हणाला ‘मी गेल्यावर संसार कर’, नंतर घेतला गळफास

Sometimes leaders, sometimes judges, sometimes big officials saying cheated, Who is Sukesh Chandrasekhar?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.