PUBG : पबजी खेळायला नकार, आईवर गोळ्या झाडल्या, मग बापाला व्हिडीओ कॉल, 3 दिवस मृतदेहासोबतच! बापरे…

PUB G Son killed mother : पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा 10 वर्षांची लहान बहीणही त्याच खोलीत होती.

PUBG : पबजी खेळायला नकार, आईवर गोळ्या झाडल्या, मग बापाला व्हिडीओ कॉल, 3 दिवस मृतदेहासोबतच! बापरे...
मुलानं केली आईची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 10:32 AM

पबजीचा (PUBG MOBILE GAME) नाद फार वाईट. इतका वाईट की तो एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो किंवा मग एखाद्याचा जीव घेण्याचं कारणही ठरु शकतो. पबजीच्या गेममुळे मुलं दिवसागणिक हिंसक होत आहेत, असा एक प्रश्नही उपस्थित केला जातो. दरम्यान, आता तर एका मुलानं पबजी खेळायला आईने नकार दिला, म्हणून तिची गोळ्या घालून हत्या (Son Killed mother) केली. हत्या केल्यानंतर या मुलानं जे केलं ते तर त्याहूनही भीषण होतं. आपल्या आईच्या हत्येनंतर तीन दिवस हा मुलगा तसाच मृतदेहासोबत (Dead Body) राहिला. यावेळी त्याने आपल्या धाकट्या बहिणीला मृतदेहासोबत खोलीत बंद केलं आणि स्वतः ही मृतदेहासोबत खोलीत लपून राहिला. मृतदेह कुजण्याचा वास येऊ लागल्यानंतर शंका आली. शंकेनंतर चौकशी केली गेली. त्यानंतर जे सत्य समोर आलं, त्यानं सगळेच हादरले. आईची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या या मुलाचं वय आहे, अवघं 16 वर्ष.

नेमकं काय घडलं?

ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. या घटनेनं पोलिसही हादरुन गेले. सडलेल्या मृतदेहाचा दुर्गंध पसरल्यानंतर पोलिसांनी तपास केला. घराच्या बाहेर नाकावर रुमाल ठेवून पोलीस घराबाहेर पोहोचले. तेव्हा संपूर्ण परिसरात मृतदेहाचा दुर्गंध पसरलेला होता. घरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत बेडवर एक मृतदेह पडलेला असल्याचं पाहिलं. हा मृतदेह इतका सडला होता, की त्याची ओळखच करणं अशक्य झालं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलानं बापाच्या लायसन्स आणि लोडेड गनने गोळ्या झाडून आईची हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर हत्येच्या काही क्षणांनंतर या मुलानं बापाला व्हिडीओ कॉलही केला. आपण आईची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर बापानं आपल्या नातेवाईकांपैकी एकाला फोन करुन घरी जाण्यास सांगितलं तेव्हा ही थरारक घटना उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा 10 वर्षांची लहान बहीणही त्याच खोलीत होती. भावानं केलेल्या कृत्यामुळे ती एवढी धास्तवली होती की तिचं रडू थांबत नव्हतं. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. या मुलीसमोरच त्यानं आपल्या जन्मदात्या आईवर गोळ्या झाडल्याची शंका पोलिसांना आहे.

शनिवारी आई आणि मुलामध्ये पबजी गेम खेळण्यावरुन वाद झाला होता. आई त्याला सारखी पबजी खेळण्यावरुन रोखायची. पण शनिवारी तर कहरच झाला. रात्री आई साखर झोपेमध्ये असताना दोन वाजता मुलानं कपाटातून बंदूक काढली आणि आईला गोळ्या घातल्या. यानंतर मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी तो रुममध्ये फ्रेशनरही मारत राहिला होता.

पबजी बनतोय मृत्यूचा सापळा

  1. 22 एप्रिल 2022 – रायगडमध्ये घरातल्यांनी पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून 19 वर्षीय दुर्गा प्रसादची आत्महत्या
  2. 11 ऑक्टोबर 2021 – महाराष्ट्राच्या जामनेमध्ये बारावीतील विद्यार्थ्याला पजबी खेळण्याच्या नादात गळफास बसला आणि दगावला
  3. 3 जुलै 2020 – बुलंदशहरात अकरावीच्या विद्यार्थ्यानं पबजी खेळातून आलेल्या नैराश्यामुळे गोळ्या घालून घेत आत्महत्या केली
  4. 26 जून 2020 – महाराष्ट्राच्या यवतमाळमध्ये २२ वर्षांच्या मुलानं गेममधील टास्क पूर्ण न झाल्यानं आत्महत्या केली
  5. 12 जानेवारी 2020 – मुथरेत १९ वर्षीय मुलाला पबजी खेळण्यास मनाई केल्यानं आत्महत्या
  6. 30 जून 2019 – भिवंडी भावाने पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून १५ वर्षांच्या मुलाने आपल्या भावाची कैंची हत्या केली
  7. 3 एप्रिल 2019 – हैदराबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याला आईने पबजी खेळण्यास मनाई केल्यानं त्यानं आत्महत्या केली
Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....