पोटच्या पोरानं इन्स्टा स्टोरी ठेवत आईला संपवलं, सॉरी आई मी तुला मारुन टाकलं, मला आता…

आई आणि मुलाचं नातं हे जगात सर्वात मोठं असतं. कोणताही मुलगा सुरुवातीपासूनच आपल्या आईसोबत इतक्या घट्ट नात्यात असतो की तो कधीच तिच्यापासून लांब जाऊ शकत नाही. आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा जीव घेतला. इतकंच नाही तर यानंतर इन्स्टाग्रामवर आईसोबतचा फोटो ठेवत तिची माफी देखील मागितली. हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय.

पोटच्या पोरानं इन्स्टा स्टोरी ठेवत आईला संपवलं, सॉरी आई मी तुला मारुन टाकलं, मला आता...
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 8:49 PM

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने लोकं संताप देखील व्यक्त करत आहेत. गुरुवारी राजकोटमध्ये आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. ही सामान्य हत्या नव्हती, या खुनात नातेसंबंधांचीही हत्या झालीये. जगातील सर्वात अतूट नात्याचा खून करण्यात आला. आई-मुलाच्या नात्याचा खून. मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला आहे.

मुलाने त्याच्या आईचा गळा दाबून खून केला आणि यानंतर मुलाने त्याच्या इंस्टाग्रामवर आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्या स्टेटसमध्ये लिहिले की, “सॉरी आई मी तुला मारलं, मला तुझी आठवण येते, ओम शांती. आरोपी मुलगा आता राजकोट पोलिसांच्या ताब्यात आहे. पण या मुलाने आईला का मारलं? हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल. गुरुवारी राजकोटमधील सरकारी क्वार्टरमध्ये एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजकोट पश्चिम क्षेत्राच्या एसीपी राधिका भारद्वाज यांनी सांगितले की, भरत नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी 48 वर्षीय ज्योतिबेन गोसाई यांचा मृतदेह घरातून बाहेर काढला. पोलिसांनी निलेश गोसाई या मुलाची चौकशी केली असता त्यानेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. चौकशीत नीलेशने आधी चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले, मात्र आईने चाकू हिसकावला. यानंतर त्याने आईचे तोंड व गळा चादरीने दाबून खून केला.

हत्येनंतर नीलेशने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्या स्टेटसमध्ये लिहिले, “सॉरी मॉम, ओम शांती, मिस यू मॉम”, सॉरी माँ, ओम शांती, मिस यू माँ”. ) आरोपी निलेशची मयत आई ज्योतिबेन या अनेक वर्षांपासून मानसिक आजारी असून, घटनेच्या दिवशीही असाच प्रकार घडला असून आरोपी निलेशने त्याच्या आईचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

आरोपीची आई ज्योतिबेन आणि वडिलांचा सुमारे 20 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे आरोपी निलेश आणि त्याची आई दोघेही एकत्र राहत होते. निधन झालेल्या ज्योतीबेन यांच्यावर अनेक वर्षांपासून मानसिक आजारावर उपचार सुरू होते, मात्र गेल्या एक महिन्यापासून त्यांनी औषध घेणे बंद केले होते, त्यामुळे त्यांचे मन अधिकच अस्वस्थ झाले होते. या प्रकरणात आणखी वेदनादायक बाब म्हणजे ज्योतिबेन यांच्या पतीने आणि त्यांच्या इतर मुलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले.अखेर पोलिसांनी स्वत: तक्रारदार बनून तक्रार नोंदवून अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.