मित्रांना भेटायला जातो सांगून घरुन गेला भाजप आमदाराचा मुलगा, मग जे घडले त्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली !
पोस्ट कोरोनाच्या त्रासामुळे महतो यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरु आहेत. यामुळे विवेक सतत मानसिक तणावात होता. तसेच अभ्यासाचाही त्याला ताण होता.
धनबाद : कौटुंबिक तणावातून झारखंडमधील धनबादचे भाजप आमदार इंद्रजीत महतो यांच्या मोठ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवेक महतो असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विवेक हा रविवारी मध्यरात्री मित्रांना भेटायला जातो सांगून घरुन गेला. मात्र त्यानंतर त्याने सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या. यामुळे तब्येत खालावली. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याला रांची येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल तपास सुरु केला. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.
वडिलांचा आजार आणि अभ्यासामुळे तणावात होता
इंद्रजीत महतो यांना 2021 मध्ये कोरोना झाला होता. त्यानंतर ते गेली दोन वर्षे आजारी आहेत. पोस्ट कोरोनाच्या त्रासामुळे महतो यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरु आहेत. यामुळे विवेक सतत मानसिक तणावात होता. तसेच अभ्यासाचाही त्याला ताण होता. काही दिवसांपूर्वी त्याने बीटेकची परीक्षा दिली होती.
मित्राला भेटायला जातो सांगून गेला
रविवारी रात्री विवेक रांचीतील सिल्ली स्थित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आपल्या मित्राला भेटायला जातो सांगून घरातून गेला. मात्र घरुन गेल्यानंतर त्याने सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या.
कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी सुरु
याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ विवेकला रांची येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस कुटुंबीय, मित्रांची चौकशी करत आहेत.
विवेकच्या मृत्यूबाबात भाजप नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. तणावातून विवेक आत्महत्या केली असली तरी पोलीस अन्य बाजूने तपास करत आहेत.