सोलापुरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या, वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल

बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे आई त्याच्या खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली. तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला.

सोलापुरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या, वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल
CRIME
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 4:32 PM

सोलापूर : वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. अमर तुकाराम माळी(20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आईच्या साडीने गळफास लावून अमरने आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मयत अमरते वडिल तुकाराम माळी हे एसटी कर्मचारी असून सध्या ते एसटी कर्मचारी संपात सहभागी आहेत.

वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने नाराज होता

अमरने बुधवारी सकाळी वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र दोन-तीन महिने झाले एसटी कर्मचारी संप सुरु असल्याने पगार नाही. त्यामुळे तुला कुठून पैसे देऊ असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर वडील आंदोलनाच्या ठिकाणी निघून गेले. अमरही घरातून बाहेर निघून गेला आणि दुपारी परत आला. अमर घरी आला तेव्हा त्याची आई आणि काकी जेवण करीत होत्या. आईने त्याला जेवणासाठी आग्रह केला. मात्र त्याने जेवणास नकार दिला आणि आराम करतो सांगून स्वतःच्या खोलीत निघून गेला.

आवाज देऊनही प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडला

बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे आई त्याच्या खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली. तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला. दरवाजा आतून बंद असल्याने मोठ्या भावाने शेवटी खिडकीतून डोकावून पाहिले असता अमर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश करीत अमरला खाली उतरवले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमरने दयानंद महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. (Son of ST employee commits suicide in Solapur after father failed to pay for expenses)

इतर बातम्या

Kalyan Crime | इराणी गल्लीत प्रचंड गोंधळ, महिलांचा विरोध, कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

Satara | गर्भवती महिला वनसंरक्षकास मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अखेर बेड्या, आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर कारवाई

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.