Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणाचं गूढ उकलणार? आज अटक केलेल्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

सुरुवातीला सोनाली फोगाट यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता समोर हळूहळू पोलिसांकडून केल्या जात असलेल्या तपासातून रोज नवनवे खळबळजनक उलगडे होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणाचं गूढ उकलणार? आज अटक केलेल्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी
सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने दिले होते ड्रग्ज Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 3:54 PM

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गोव्यातील हणजूण पोलिसांनी (Anjuna Police Goa) आज मोठी कारवाई केली होती. हणजूण येथील कर्लिस क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली होती. कर्लिस क्लबचा मालक आणि ड्रग पेडलरला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. या दोघांनाही कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. दरम्यान, या अटकेआधी पोलिसांनी क्लबच्या बाथरुममधून ड्रग्जही जप्त केले आहेत. सोनाली फोगाट यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले होते. फोगाट यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या सनसनाटी आरोपानंतर पोलिसांनी सुरुवातीला सुधीर सांगवान आणि सुखबिंदर सिंग यांना अटक केली होती. सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमांचे निशाण असल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं होतं. तेव्हापासून सोनाली फोगाट यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासह 22 ऑगस्टला गोव्यात पोहोचल्या होत्या. सोनाली यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आहे. या चौघांचीही आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. सोनाली फोगाट यांची हत्या करण्यात आली होती का? हत्या झाली तर ती कुणी केली? का केली? या प्रश्नांचंही गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

कुठून सुरु झालं प्रकरण?

सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी हणजुण पोलिसांत सगळ्यात आधी हत्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आपल्या बहिणीची खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आपल्या तक्रारीत त्यांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्यावर संशय व्यक्त केला होता. सोनाली यांच्या ड्रिंकमध्ये मादक पदार्थ घोळवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलंय. त्या अनुशंगाने पुढील तपास केला जातोय. 22 ऑगस्ट रोजी हे दोघेही जण सोनाली फोगाट यांच्यासोबत गोव्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

कर्लिस क्लबचा काय संबंध?

गोव्यातस कर्लिस क्लबमध्ये सोनाली फोगाट या गेल्या होत्या. या कर्लिस क्बलच्या ज्या बाथरुममध्ये ड्रग्स आढळून आले आहे, त्याच बाथरुममध्येही त्या गेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही बाबींची एकमेकांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सुरुवातील सोनाली फोगाट यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता समोर हळूहळू पोलिसांकडून केल्या जात असलेल्या तपासातून रोज नवनवे खळबळजनक उलगडे होत असल्याचं पाहायला मिळतंय. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलण्याच गोवा पोलिसांना नेमकं यश कधी येतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.