Salman Khan: सलमान खानला संपवण्यासाठी शूटर राजस्थानहून मुंबईत आला पण पुढं जे झालं त्यानं भाई वाचला, स्पेशल सीपीकडून धक्कादायक माहिती उघड

लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीने चौकशी केली होती, ज्यामध्ये लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. सलमान खानला मारण्याची जबाबदारी राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला दिली होती, असे बिश्नोईने चौकशीत सांगितले. लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीने चौकशी केली होती, ज्यामध्ये लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती.

Salman Khan: सलमान खानला संपवण्यासाठी शूटर राजस्थानहून मुंबईत आला पण पुढं जे झालं त्यानं भाई वाचला, स्पेशल सीपीकडून धक्कादायक माहिती उघड
सलमान खानला संपवण्यासाठी शूटर राजस्थानहून मुंबईत आला पण पुढं जे झालं त्यानं भाई वाचलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:11 PM

नवी दिल्ली : सलमान खान (Salman Khan) धमकी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासा (Reveals) केला आहे. समानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने 2021 मध्ये राजस्थानमधील गँगस्टर संपत नेहरा (Sampat Nehra) याला जबाबदारी दिली होती. यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला. त्याने सलमान खानच्या घराची रेकी केली. मात्र जास्त अंतर असल्यामुळे तो सलमान खानपर्यंत पोहचू शकला नाही. तसेच संपतकडे जी पिस्टल होती तिने जास्त अंतरावरुन निशाणा लावू शकत नव्हता. लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीत ही बाब उघड झाल्याचा खुलासा स्पेशल सीपी एचजीएस धारीवाल यांनी केला आहे. स्पेशल सीपी एचजीएस धारिवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईने अलीकडील चौकशीत कबूल केलेल्या स्प्रिंग रायफल बाबतही सांगितले आहे.

स्प्रिंग रायफल पोलिसांनी शोधली काढत संपत नेहरालाही अटक केले

लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीने चौकशी केली होती, ज्यामध्ये लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. सलमान खानला मारण्याची जबाबदारी राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला दिली होती, असे बिश्नोईने चौकशीत सांगितले. लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीने चौकशी केली होती, ज्यामध्ये लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. संपत नेहराला त्याच्या गावातील दिनेश फौजी याच्याकडून आरके स्प्रिंग रायफल मिळाली. स्प्रिंग रायफल लॉरेन्स बिश्नोईने अनिल पांड्याकडून 3 ते 4 लाखांना विकत घेतली होती. ही रायफल दिनेश फौजीकडे होती, ती पोलिसांनी शोधून काढली आणि त्यानंतर संपत नेहराला अटक केली, असे एचजीएस धारीवाल यांनी पुढे सांगितले.

महाराष्ट्रातील सौरभ महाकाळच्या चौकशीत संतोष आणि नवनाथ सूर्यवंशी या दोन शूटरची माहिती समोर आली आहेत. दोघांना तीन-तीन लाख आणि त्याला 50 हजार दिल्याचे महाकाळ यांने सांगितले. विक्रम ब्रार याने या हत्येची जबाबदारी नेमबाजांना दिली होती. मात्र, अलीकडे सलमानच्या घरी रेकी झाल्याची कोणतीही माहिती नाही. (Special CP reveals that sharpshooter came to Mumbai from Rajasthan to kill Bollywood actor Salman Khan)

हे सुद्धा वाचा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.