Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | पालघर मॉब लिंचिंग, हाथरसपासून ते सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण… 2020मधील ‘या’ घटनांनी संपूर्ण देश हादरवला!

क्राईमच्या बाबतीतही हे वर्ष ओळखलं जाईल. यावर्षी देशात अनेक अशा घटना घडल्या ज्या लोक कदाचित कधीही विसरु शकणार नाहीत.

Special Story | पालघर मॉब लिंचिंग, हाथरसपासून ते सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण... 2020मधील 'या' घटनांनी संपूर्ण देश हादरवला!
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 12:06 PM

मुंबई : भविष्यात जेव्हा केव्हा वर्ष 2020 चा उल्लेख केला जाईल, तेव्हा सर्वातआधी कोरोनाचीच चर्चा होईल (Biggest Crime Cases In 2020). त्याला कारणंही तसेच आहे. भूतो न भविष्यती अख्ख्या जगाने जे पाहिलं नसेल ते कोरोनाने दाखवलं. दिवसरात्र धावणाऱ्या जगातील कित्येक शहरं कोरोनामुळे रात्रीच नाही तर दिवसाही ओस पडलेली पाहायला मिळाली. कधी नव्हे तो ‘लॉकडाऊन’ अनुभवायला मिळाला. त्यामुळे हे वर्ष कोरोनासाठीच ओळखलं जाईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण, फक्त कोरोनाच या वर्षाचं वैशिष्ट्य ठरलं नाही तर वर्षभरात अनेक अशा घटना घडल्या ज्यासाठी हे वर्ष लक्षात राहिल (Biggest Crime Cases In 2020).

क्राईमच्या बाबतीतही हे वर्ष ओळखलं जाईल. यावर्षी देशात अनेक अशा घटना घडल्या ज्या लोक कदाचित कधीही विसरु शकणार नाहीत. यामध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, ड्रग्ज केस, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना मिळालेली शिक्षा यासर्व प्रकरणांचा समावेश आहे.

24 फेब्रुवारी 2020 : दिल्ली हिंसा

गेल्या वर्षात गुन्ह्यांच्याबाबतीत दिल्ली पुन्हा एकदा चर्चेत राहिली. दिल्लीने दंगलीचं एक असं भयाणक रुप पाहिलं जे कधीही विसरता येणार नाही.या दंगलींची सुरुवात 24 फेब्रुवारी 2020 पासून झाली. यामध्ये एकूण 53 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर शेकडो जण जखमी झाले. त्यानंतर दिल्लीच्या जाफराबाद, गोकुलपुरी आणि घोंडा सारख्या परसरात आता दोन समाजामध्ये आधीसारखा बंधुभाव राहिलेला नाही.

जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या खाली मुख्य रस्त्यावर शेकडो महिला आणि लहान मुलं मुख्यमंत्र्याविरोधात धरणे आंदोलनावर बसले होते. यामुळे तिथे ट्राफीक जाम झालं आणि लोकांना त्यामुळे समस्येला सामोरे जावं लागलं. 23 फेब्रुवारीला भाजप नेते कपिल मिश्रा हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह आंदोलन स्थळी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की जर 24 तासात पोलिसांनी हे आंदोलन थांबवून आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरुन हटवलं नाही तर सामान्य जनता स्वत: याविरोधात पावलं उचलतील. त्यानंतर त्याच सायंकाळी जाफराबाद येथे जमलेल्या जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारीला येथे 144 लागू करण्यात आली. पण, हिंसाचार भडकला आणि दिल्लीचा हा परिसर अनेक दिवसांपर्यंत धगधगत्या आगीप्रमाणे ज्वलंत राहिला.

20 मार्च 2020 : निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गेल्या आठ वर्षांपासून मागणी होत होती. त्याप्रकरणी अखेर सत्याचा विजय झाला आणि निर्भयाला न्याय मिळाला. या प्रकरणातील चारही नराधमांना 20 मार्चच्या सकाळी दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. यापूर्वी याप्रकणी तीनवेळा डेथ वॉरंट काढण्यात आले. मात्र, काही ना काही कारणांमुळे त्यात अडथळा येत राहिला.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीच्या रस्त्यावर एक असा गुन्हा घडला, ज्याचा विचार करुनही अंगावर काटा उभा राहतो. या रात्री दिल्लीमध्ये निर्भयासोबत चालत्या बसमध्ये या नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. फक्त बलात्कार नाही तर तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तब्बल 13 दिवस मृत्यूला कडवी झुंज तिने दिली. मात्र, ही लढाई ती हरली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

16 एप्रिल 2020 : पालघर मॉब लिंचिंग केस

महाराष्ट्रातील पलघरमधील मॉब लिंचिंग केस, हे देखील एक असं प्रकरण आहे जे नेहमी लक्षात राहिल. 16 एप्रिलच्या रात्री इथे दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला निर्घृणपणे मारुन टाकलं. या घटनेने माणुसकीवरुन लोकांचा विश्वास उडाला. पोलिसांनी याप्रकरणी शेकडो लोकांना अटक केली. या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयात सुरु आहे.

हत्या करण्यात आलेले साधु हे गाडीने सुरतला जात होते. तेव्हा पालघरच्या गडचिंचले गावातील जमावाने त्या साधुंना लहान मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तब्बल 400 लोकांना अटक करण्यात आली (Biggest Crime Cases In 2020).

14 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू

गेल्या वर्षी अनेक अशा घटना झाल्या ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू. पवित्र रिश्ता मालिकेतील ‘मानव’ आणि बॉलिवूडमधील अनेक सिनेमामंधील उत्कृष्ट अभिनयाने देशातील नागरिकांच्या मनात स्थान मिळवलेला सुशांत 14 जूनच्या सकाळी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण देश हळहळला. 34 वर्षीय सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं.

पण, सुशांतच्या कुटुंबाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर या घटनेला वेगळं वळण मिळालं. सुशांतच्या घरच्यांनी त्याच्या मृत्यूसाठी थेट अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप लावला. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सध्या 145 दिवसांच्या तपासानंतरही सीबीआय सुशांतच्या मृत्यूबाबत ठोस अहवाल देऊ शकलेली नाही.

2 जुलै 2020 : कानपूर विकास दुबे प्रकरण

कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाण्याअंतर्गत बिकरु गावात एकावेळी आठ पोलिसांचा खून करुन संपूर्ण प्रशासनाला हादरवून ठेवणारा गँगस्टर विकास दुबे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आलं. पोलिसांचा खून करुन फरार असलेल्या विकासला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली.

एनकाऊंटरच्या भीतीने विकास दुबेने त्याला अटक करताना मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर ओरडून ओरडून त्याची ओळख सांगितली होती. त्याला वाटलं की यामुळे पोलीस त्याचं एनकाऊंटर करणार नाही. पण, काहीच तासात विकास दुबेला एनकाऊंटरमध्ये ठार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या थोडं लांब सचेंडी परिसरात विकास दुबेला घेवून येणाऱ्या गाडीचा अपघात झाला. यावेळी विकास दुबेने पोलिसांची बंदून हिसकावून घेतली आमि गोळीबार करत तो पळू लागला. यावेळी त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.

26 ऑगस्ट 2020 : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन पुढे आलं. या प्रकरणात सर्वातआधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविकलाही अचक करण्यात आली. त्यानंतर एकानंतर एक बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या चौकशीचं सत्र सुरु झालं. रियावर सुशांतला ड्रग्ज देण्याचा आरोप होता. तसेच, ती ड्रग्स सिडिकेंटमध्येही सहभागी असल्याचं म्हटलं गेलं. रियाला महिन्याभराच्या तुरुंगवासानंतर जामीन मंजूर झाला. तर तिचा भाऊ अद्यापही तुरुंगात आहे.

यादरम्यान, सुशांतच्या मृत्यूचा तपास मागे पडला आणि बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनवर एनसीबीने अधिक लक्ष दिलं. अखेर रियाने तिचा गुन्हा कबुल केला आणि त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक बड्या प्रसिद्ध अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आल्या. अभिनेत्री दीपिका पादुकोणचीही खूपवेळपर्यंत चौकशी करण्यात आली. त्याशिवाय, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रित सिंग, अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचीही चौकशी करण्यात आली.

14 सप्टेंबर 2020 : हाथरस सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या एका गावात 14 सप्टेंबरला एक तरुणी शेतात गंभीर परिस्थितीत आढळून आली. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप होता. यानंतर तात्काळ पीडितेला अलिगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान, पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्याच गावातील चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी सर्व नराधमांना अटक केली. पण, पोलिसांनी जबरदस्ती पीडितेवर गावात अंत्यसंस्कार केले.

पोलिसांनी शेवटच्या क्षणी आम्हाला आमच्या मुलीला नीट डोळेभरुन बघूही दिले नाही, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर न्यायालयाने युपी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने या प्रकरणी 18 डिसेंबरला न्यायालयात चार्जशीट दाखल केली. सीबीआयने चार्जशीटमध्ये त्या सर्व चार आरोपींचं नाव दिलं आहे ज्यांच्याविरोधात पीडितेने मृत्युपूर्वी साक्ष दिली होती.

Biggest Crime Cases In 2020

संबंधित बातम्या :

नात्याला काळिमा! दीड कोटींच्या विम्यासाठी दत्तक मुलाचा बळी; आता खुलेआम फिरतंय जोडपं

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळी घालून हत्या; बाईकवरून जात असताना हल्ला

Rekha Jare Murder | बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.