तुटपुंजा पगार, कर्जही वाढलं, एसटी महामंडळ कर्मचाऱ्याने शेवटी मृत्यूला कवटाळलं, आत्महत्येमुळे धुळे सुन्न
धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे हे मागील कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचा पगार अतिशय तुटपुंजा आहे. आधीच पगार कमी आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते. तसेच कमलेश यांच्यावर कर्जदेखील वाढल्याने ते नैराश्यात गेले होते. शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी आज (27 ऑगस्ट) आत्महत्या केली.
धुळे : जिल्ह्यातील साक्री आगारमधील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी कमलेश बेडसे यांनी आज आत्महत्या केली. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही अनियमित असल्यामुळे शेवटी कंटाळून बेडसे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. या घटनेनंतर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा बेडसे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. (Dhule State Transport Corporation employee committed suicide today due to irregular salary issue)
नेमके प्रकरण काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे हे मागील कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचा पगार अतिशय तुटपुंजा आहे. आधीच पगार कमी आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते. तसेच कमलेश यांच्यावर कर्जदेखील वाढल्याने ते नैराश्यात गेले होते. शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी आज (27 ऑगस्ट) आत्महत्या केली.
त्यांच्या आत्महत्येनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. महामंडळाविरोधात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तर दुसरीकडे जोपर्यंत कमलेश बेडसे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा बेडसे यांनी घेतला.
दरम्यान, बसमध्ये जास्तीत जास्त प्रवासी बसावेत तसेच जास्तीत जास्त भाडे मिळावे यासाठी शिवशाही आणि सामान्य बस कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला. हा प्रकार औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर आज (27 ऑगस्ट) घडला. औरंगाबाद शहरातील बसस्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यास सांगितले गेले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला. हा वाद नंतर विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर अक्षरश: गोंधळ घातला.
इतर बातम्या :
गावठी कट्टा कंबरेला बांधून गावभर फिरला, शेवटी पोलिसांनी दाखवला इंगा, तरुणाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना
Dhule State Transport Corporation employee committed suicide today due to irregular salary issue