मालकाने विश्वास ठेवला होता पण त्याची नितीमत्ता फिरली, एका रात्रीत त्याला लखपती व्हायचे होते पण…
खरंतर ट्रकमध्ये जवळपास साडेचार लाखांचा माल होता. तो संपूर्ण माल चोरीला गेल्याने ट्रक मालकाने पंचवटी पोलीस ठाण्यात धावून घेऊन गुन्हा दाखल केला होता.
नाशिक : एका ट्रक चालकाने ट्रकमधील लाखों रुपयांचा माल पाहून ट्रकसह माल चोरी ( Nashik Crime ) केला होता. नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड ( Sharad Pawar Market Yard ) येथून संशयित ट्रक चालक हा फरार झाला होता. मार्केट मध्ये माल न पोहचल्याने मालकाने शोध सुरू केला होता. त्यात संशयित ट्रक चालकासह ट्रक चोरीला गेल्याचे मालकाच्या निदर्शनास आले होते. ट्रक मध्ये लाखों रुपयांचा माल वेळेत न पोहचल्याने मालकाने ट्रकचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पोलिस ठाण्यात पोहचून याबाबत माहितीही देण्यात आली होती. त्यावरून पोलीसांनी तपास सुरू केला होता.
खरंतर ट्रकमध्ये जवळपास साडेचार लाखांचा माल होता. तो संपूर्ण माल चोरीला गेल्याने ट्रक मालकाने पंचवटी पोलीस ठाण्यात धावून घेऊन गुन्हा दाखल केला होता. मार्केट यार्ड परिसरातून ट्रकसह चालक नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
मात्र, अशातच ट्रकमध्ये जवळपास साडे चार लाखांचा माल धुळ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये तुपाचे डबे, मेडीसीन बॉक्स, सायकलीचे पार्ट, धुप बॉक्स, सायकल ट्युब बॉक्स, हार्डवेअर बॉक्सचा समावेश आहे.
धुळ्यातील अंबिकानगरमध्ये हा संपूर्ण माल विक्रीला गेल्याचे समोर आले असून ट्रकसह संशयित चालक हितेश नानजीभाई पटेल आणि धुळ्यातील साथीदार विशाल वाघ हे दोघेही फरार आहे.
लाखों रुपयांचा माल विकून पसार व्हायचे होते, त्यासाठी त्यांनी संपूर्ण माल धुळ्यात ठेवला होता. त्याच दरम्यान पोलीसांनी या चोरीचा भांडाफोड केला आहे. त्यामुळे ट्रक चालकाला पोलीसांनी चोरी पचवू दिली नाही.
यापूर्वीही नाशिकमध्ये अशा घटना घडल्या आहेत. मात्र, अवघ्या काही तासातच या चोरीचा भांडाफोड झाला असल्याने नाशिक शहर पोलीसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे. संशयित ट्रक चालक हिटेश पटेल आणि साथीदार विशाल वाघ यांचा पोलीस शोध घेत आहे.
तांत्रिक बाबींच्या आधारावर नाशिक शहर पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस केला असला तरी एवढा मोठा ट्रक कुठे लपवून ठेवलाय याचा शोध लागत नसल्याने तक्रारदाराला चिंता कायम आहे. मार्केट येथून यापूर्वी अशीच वाहनं चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
मात्र, यामध्ये स्वतः ट्रक चालकच चोरटा निघाल्याने विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न यानिमित्ताने मार्केट यार्ड परिसरात उपस्थित केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.