Ram Mandir | गुजरातमधून अयोध्येला निघालेल्या ‘या’ ट्रेनवर दगडफेक, कुठे घडली घटना?

Ram Mandir | वंदे भारत नंतर आता आस्था स्पेशल ट्रेन सुद्धा सुरक्षित नाहीय. सूरतहून अयोध्येला निघालेल्या ट्रेनवर दगडफेक झालीय. या प्रकाराने प्रवासी घाबरले होते. त्यांनी लगेच दार, खिडक्या बंद करुन घेतल्या.

Ram Mandir | गुजरातमधून अयोध्येला निघालेल्या 'या' ट्रेनवर दगडफेक, कुठे घडली घटना?
stone pelting attack on ayodhya train
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 12:19 PM

सूरत : गुजरातच्या सूरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं. रविवारी या ट्रेनवर जोरदार दगडफेक झाली. सूरतहून रात्री आठच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती. ट्रेन नंदूरबार येथे पोहोचताच रात्री 10.45 च्या सुमारास अचानक दगडफेक सुरु झाली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. त्यांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. पण अनेक दगड ट्रेनमध्ये येऊन पडले. या दगडफेकीत कोणी जखमी झाल्याची माहिती नाहीय.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफने सुरुवातीच्या तपासानंतर ट्रेनला रवाना केलं. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री 8 वाजता निघाली होती. एकूण 1340 प्रवासी या ट्रेनमध्ये होते. ट्रेनमधील प्रवाशी जेवल्यानंतर भजन करत झोपणार होते. पावणेअकराच्या सुमारास ट्रेन नंदूरबार येथे पोहोचली. इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरु झाली.

अनेक दगड ट्रेनच्या आत आले

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाजूंनी दगड येत होते. एक नाही, तर अनेकजण दगडफेक करत असल्याचा संशय आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले. त्यांनी लगेच दरवाजे, खिडक्या बंद केल्या. मात्र, तरीही अनेक दगड ट्रेनच्या आत येऊन पडले होते.

पहिली ट्रेन कधी रवाना झालेली?

जीआरपीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. सहा फेब्रुवारीला गुजरातहून पहिली आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येला रवाना झाली होती. या ट्रेनला मेहसाणा रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी सांगण्यात आलं होतं की, लवकर आणखी काही ट्रेन गुजरातच्या अन्य रेल्वे स्थानकातून सोडल्या जातील. याचाच भाग म्हणजे रविवारी सूरतहून आस्था स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

आस्था एक्सप्रेस वर कुठलीही दगडफेक झाली नसल्याच्या पोलीस प्रशासनाच्या दावा

सूरतवरून अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाली असल्याच्या प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली होती. परंतु अशी कुठलीही घटना घडली नसल्याचा रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ज्या ठिकाणी घटना घडली असल्याची माहिती मिळाली, त्या ठिकाणी संशयित मनोरुग्ण असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. परंतु हे मनोरुग्ण असल्याने त्याच्याकडून पोलीस विभागाला व्यवस्थित माहिती मिळत नाहीय. त्यामुळे या विषयात पुढे काही माहिती मिळणार का? हा देखील महत्वाचा विषय आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.