Solapur Crime : सोलापुरात दोन गटात तुफान दगडफेक, काही जणांना घेतले ताब्यात, घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात

गणेशोत्सवानिमित्ता मंडळाची बैठक होती. बैठकीनंतर काही जण चहा प्यायला गेले होते. मात्र काही वेळात रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. पोलीस वेळीच धावून आले म्हणून अनर्थ टळला.

Solapur Crime : सोलापुरात दोन गटात तुफान दगडफेक, काही जणांना घेतले ताब्यात, घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात
सोलापुरात क्षुल्लक वादातून दोन गटात दगडफेकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 2:52 PM

सोलापूर / 17 ऑगस्ट 2023 : सोलापुरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली. शहरातील शास्त्रीनगर परिसरात मध्यरात्री दोन गट आमने सामने आले. एकमेकांवर तुफान दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती मिळते. रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात कारण्यात आला आहे. दरम्यान, दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी 10 जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.

दुर्गादास विजय म्हेत्रे, सागर दिपक कोरे, प्रशांत हिरालाल सोंडेकर, प्रथमेश संजय कोल्लुर, महेश रमेश कोरे, संतोष वसंत मरेड्डी, गणेश भारत रोकडे, पंकज संजय कोल्लुर, योगीराज राजू म्हेत्रे, अरबाज शब्बीर बेपारी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावं आहेत. सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली आहे.

काय आहे प्रकरण?

गणेशोत्सव तोंडावर आला असून, यानिमित्त सतनाम चौकात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठ आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर काही कार्यकर्ते शास्त्रीनगर परिसरात चहा पिण्यासाठी गेले. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी केली. यावरुन दोन्ही गटात जुंपली आणि दोन्ही गटात दगडफेक सुरु झाली.

हे सुद्धा वाचा

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दीला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. अटक आरोपीविरोधात भादवि कलम 143, 147, 160, 323 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, अद्यापही या परिसरात पोलीस बंदोबस्त आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.