मोठमोठे नेते-मंत्र्यांना वेश्या पुरवायचा, दारुचा धंदा ते सेक्स रॅकेट, 80 चं दशक दणाणून सोडणारा ऑटो शंकर !

आम्ही आज ज्या गुन्हेगाराची कहाणी सांगत आहोत त्याचं नाव ऑटो शंकर. नाही म्हणजे त्याचं खरं नाव गौरी शकंर असं होतं. पण तो गुन्हेगारी विश्वात पदार्पण करण्याआधी एक ऑटो रिक्षाचालक होता. त्यानंतर त्याने रिक्षाच्या माध्यमातून गैरकृत्यांना सुरुवात केली.

मोठमोठे नेते-मंत्र्यांना वेश्या पुरवायचा, दारुचा धंदा ते सेक्स रॅकेट, 80 चं दशक दणाणून सोडणारा ऑटो शंकर !
कुख्यात गुंड ऑटो शंकरला जेव्हा पोलिसांनी अटक केली होती त्यावेळचा हा फोटो आहे (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 8:05 AM

मुंबई : आपण इतिहासाचा अभ्यास का करतो? भूतकाळात ज्या वाईट घटना घडल्या आहेत त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच. उलट त्या घटनांमधून धडा शिकून तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यातून मार्ग कसा काढायचा याचं मंथन करण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करतो, असं एक साधं आणि सोपं कारण आहे. इतर कारणं देखील आहेत, पण हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला दररोज भूतकाळातल्या भयानक सीरिअल किलर किंवा कुख्यात गुंडांची माहिती देत आहोत. हे गुंड जेव्हा गुन्हेगारी विश्वास प्रवेश करतात तेव्हाच त्यांच्या नांग्या ठेचल्या असत्या तर त्यांच्याकडून पुढचे गुन्हे घडू शकले नसते. या गुंडांना जबाबदार ठरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्याच गोष्टी आजही जबाबदार ठरु नयेत म्हणून खबरदारी घ्यावी या उद्देशाने आम्ही या गुन्हेगारांची कहाणी सांगत आहोत.

आम्ही आज ज्या गुन्हेगाराची कहाणी सांगत आहोत त्याचं नाव ऑटो शंकर. नाही म्हणजे त्याचं खरं नाव गौरी शकंर असं होतं. पण तो गुन्हेगारी विश्वात पदार्पण करण्याआधी एक ऑटो रिक्षाचालक होता. त्यानंतर त्याने रिक्षाच्या माध्यमातून गैरकृत्यांना सुरुवात केली. तेव्हापासून त्याची ओळख ऑटो शंकर अशी पडली होती. रिक्षाचालक असताना त्याने केलेल्या अवैध धंद्यांमधून त्याच्या तोंडाला काळा पैसा लागला आणि तो पुढे कुख्यात गुन्हेगार बनला. तो एक सामान्य व्यक्ती ते कुख्यात गुंड कसा बनला? त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गौरी शंकरचा जन्म

या ऑटो शंकर याचं खरं नाव खूप गोड वाटेल असं अगदी साजूक तुपातलं असतं तसं गौरी शंकर हे नाव. तो जेव्हा जन्माला आला तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून अवघे काही आठ वर्ष झाले होते. तसा तो काळ धगधगत्या क्रांतीचाच होता. एकीकडे देश स्वातंत्र्य झालेला. स्वातंत्र्य भारतातील अनेक चांगल्या गोष्टी उदयास येत होत्या. अनेक राज्यांमध्ये असंख्य घडामोडी घडत होत्या. राजकीय, सामाजिक घटना घडत होत्या. या धडपडीच्या युगात 1955 मध्ये तामिळनाडूच्या वेल्लोर येथे गौरी शंकर याचा जन्म झाला.

शंकर मद्रास शहरात गेला

गौरी शंकर तसा कलाकार होता. तो तारुण्यात सुरुवातीला पेंटिगचे कामे करायचा. त्याकाळात तामिळनाडूत ‘जीवाची मुंबई’ असं ख्याती असलेलं एक शहर होतं. या शहराचं नाव मद्रास असं होतं. आता या शहराचं नाव चेन्नई असं आहे. मुंबईत आज शेकडो लोकं स्वप्न घेऊन येतात. ते त्यांचं स्वप्न पूर्णही करतात. गरीब, कष्टकरी, मध्यवर्गींपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच येथे येतात. हे शहर स्वप्न पूर्ण करतं म्हणून लोक मुंबईत येतात. तसंच तामिळनाडूत त्या काळात मद्रास शहर होतं. गावात खेतीतून काही मिळत नाही म्हणून लोक पोटापाण्यासाठी मद्रासला यायची. त्याकाळात मद्रास हे फार छोटं शहर होतं. म्हणजे आजच्या तुलेनेने तरी लहानच होतं. तिथली वस्ती आजच्या वस्तीपेक्षा अर्धीदेखील नव्हती. पण शहर पुढारलेलं होतं.

शंकरचे मद्रास येथील सुरुवातीचे दिवस

शंकर हा पोटापाण्यासाठी इतर लोकांसारखाच वेल्लोरहून मद्रासला आला. तो तिथे पेटिंगचे काम करु लागला. या काळात त्याचा सबंध तामिळनाडूच्या तिरुवनमयूर येथील किनारपट्टीशी आला. तिरुवनमयूर हे आज मोठं शहर आहे. पण त्याकाळात काहीच नव्हतं. तिथे ना घरं होती ना आज सारखा वाहनांचा कर्कश्य आवाज. होती ती फक्ती नुसती शांतता. तिथे साधे रोडही नव्हते. किनारपट्टीवर असंख्य नारळ आणि ताडाची झाडं दिसायची. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मोहक खेळती हवा. अगदी एखाद्या कॅमेऱ्यात कैद करावं असं ते सगळं वातावरण होतं. तिथल्या किनारपट्टीवर बसलं तर मन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही इतकं ते मोहक वातावरण होतं.

निसर्गाने परिपूर्ण असलेल्या वातावरणाला देखील एक गोष्ट शाप होती. जसं चंद्रावर एक काळा ठिपका दिसतो ना अगदी तशीच. ती म्हणजे तिथे अवैधपणे ताडीचं उत्पादन व्हायचं. विशेष म्हणजे त्या काळात तामिळनाडू सरकारने दोनवेळा दारुबंदी घोषित केली होती. म्हणजे दोन वेळा बंद केली आणि तातडीने सुरुही केली. त्यादरम्यान पेंटर शंकर हा ऑटो चालवायला लागला. मद्रासच्या किनारपट्टी भागात अवैध देशी दारुचं उत्पादन व्हायचं. विशेष म्हणजे तिरुवनमयूरच्या किनारपट्टीपासून ते महाबलीपुरमपर्यंत दूरदूरपर्यंत अवैध दारुच्या भट्ट्या चालायच्या. या धंद्यात थोडी रिस्क होती. पण पैसाही चिक्कार मिळायचा.

शंकरचा दारुचा धंदा

शंकर अवैध दारुची तस्करी करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. मद्रासमध्ये दारुचा धंदा प्रचंड होता. खूप दारु खपायची. शंकर सुरुवातीला अवैध दारुची रिक्षातून वाहतूक करु लागला. त्याकाळात रिक्षातून दारुची तस्करी होईल, असं पोलिसांना वाटलं नव्हतं. रिक्षा ही खूप सर्वसामान्य बाब होती. शहरात रिक्षा फिरत राहायच्या. त्यामुळे कुणालाही विशेषत: पोलिसांना फारसा संशय यायचा नाही.

स्वत:ची गँग सुरु

आता काळ होता 80 च्या दशकाच्या सुरुवातीचा. शंकर आता अवैध दारुची रिक्षाने फक्त वाहतूकच करायचा नाही तर आता तो तस्कर बनला होता. विशेष म्हणजे त्याची एक गँग देखील बनली होती. त्या गँगच्या माध्यमातून तो तिरुवनमयूरमध्ये राज करु लागला. त्याचा लहान भाऊ मोहन हा त्याचा उजवा हात होता. तर त्याचे मेव्हणे एल्डिन आणि शिवाजी हे देखील त्याच्या गँगचे प्रमुख होते. तसेच आणखी पाचजण होते.

देहविक्रीच्या काळ्या धंद्यात एन्ट्री

शंकर दारुच्या धंद्यानंतर पुढे देहविक्रीच्या दुनियेत शिरला. त्याने पेरियार नगरमध्ये आपला अड्डा सुरु केला. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागात त्याचे हे गैरकृत्य जास्त फुलू लागले. त्याला या धंद्यामधून इतका पैसा मिळू लागला की त्याने साऊथ मद्रासमध्य दुसरा अड्डा सुरु केला. त्याने एलबी रोड परिसरात सेक्स रॅकेटसाठी एक लाँजच सुरु केला. विशेष म्हणजे शंकरला पोलिसांचं अभय होतं. कारण त्याला अनेक पोलिसांचं वरदहस्त होतं. फक्त पोलीसच नाही तर मोठमोठे नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत त्याची ओळख होती. तो त्यांना मुली (वेश्या) पुरवायचा. त्यामुळे या शंकरची हिंमत जास्त वाढली होती.

अचानक 9 तरुणी बेपत्ता

तिरुवनमयूरमध्ये 1988 साली 9 तरुणी अचानक गायब झाल्याची घटना समोर आली. या तरुणींचं कुणीतरी अपहरण केल्याची चर्चा सुरु झाली. तरुणींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. पण पोलीस या तक्रारीकडे दुर्लश करत होती. या मुली एका सेक्स रॅकेटमध्ये काम करायला लागल्या. त्या आपल्या मर्जीने घराबाहेर पडल्या, असं पोलिसांचं म्हणणं होतं. पण मुलींच्या कुटुंबियांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. अखेर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करावा लागला. पण पुढे या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाही. मुलींचा तपासही लागला नाही.

ललिता आणि प्रियकराची हत्या

गुन्हेगारीच्या घटना एकामागेएक सुरु असताना शंकरला धक्का देणारी एक घटना घडली. त्याच्या रॅकेटमधील एक ललिता नावाची मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. शंकर तिला वेड्यासारखं शोधू लागला. अखेर ललिता आणि तिचा प्रियकर शंकरच्या हाती लागला. या शंकरने ललिताला इतक्या निघृणपणे मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. तर तिच्या प्रियकराला जिवंत जाळून टाकलं. त्यानंतर त्याने प्रियकराचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. या घटनेनंतर जवळपास दीड वर्षांनी ललिताचा कुजलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता.

शंकरच्या क्रूर कथांबद्दल अनेक गोष्टी आहेत. एकदा त्याच्या लाँजमधून एका मुलीला तीन तरुण जबरदस्ती बाहेर घेऊन जात होते. त्यावेळी शंकर त्याच लाँजमध्ये होता. त्याला मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. यावेळी शंकर आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी शंकरने त्या तरुणांना मरेपर्यंत मारलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह जमिनीत गाढून टाकला.

दारुच्या दुकानाबाहेरुन तरुणीचा अपहरण करण्याचा प्रयत्न

यादरम्यान 1988 मध्ये एक तरुणी दारुच्या दुकानाच्या बाजूने जात होती. यावेळी तिला काही गुंडांनी पकडलं. ते तिचं अपहरण करण्याच्या प्रयत्नात होते. पण ती तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. ती तातडीने पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. खरंतर आता पोलीसही या रोजरोजच्या घटनांना वैतागली होती. आता पोलिसांनी या घटना मुळासकट छाटायचं ठरवलं. पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये शहरात फिरु लागले. त्यानंतर पोलिसांना शहरातील कुख्यात डॉनची माहिती झाली. ते नावं होतं ऑटो शंकर.

अखेर शंकरचा घडा भरला

पोलिसांनी अखेर ऑटो शंकरला बेड्या ठोकल्या. पण त्याचं राजकारण आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत चांगले संबंध होते. त्यामुळे तो जामिनावर सुटला. याचदरम्यान तामिळनाडूच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांचं निधन झालं होतं. त्यामुळे तिथे राज्यपाल राजवट सुरु होतं. यादरम्यान अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनी राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांची भेट घेतील. राज्यपालांनी या प्रकरणी तपास करण्यासाठी एका मातब्बर पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तिथून ऑटो शंकरचं बिंग फुटलं आणि त्याला अखेर दुसऱ्यांदा अटक झाली.

शंकरला फाशी

पोलिसांनी शंकरच्या घरी, लाँजवर छापा टाकला. यावेळी त्यांना शंकरची एक डायरी मिळाली. त्यामध्ये तो सगळं लिहित असे. हा डायरीचा एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय शंकरने आपला गुन्हाही कबूल केला. शंकर आणि त्याच्या चार साथीदारांची मद्रास सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. पण त्या जेलमधून तो साथीदाऱ्यांसह पळून गेला. विशेष म्हणजे जेल वॉर्डननेच शंकरला पळून जाण्यात मदत केली होती. याशिवाय जेलमध्ये त्याला दारुसह अनेक चैनीच्या गोष्टी मिळायच्या. तरीही तो तिथून पळून गेला. शंकरला मदत करणाऱ्या सर्वांनाच कोर्टाने नंतर शिक्षा दिली. अखेर पोलिसांनी शंकरला ओदिशा येथून बेड्या ठोकल्या. त्यानंतर 27 एप्रिल 1995 रोजी सालेम जेलमध्ये त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.

नेते-मंत्र्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची नावे गुलदस्त्यातच

शंकरला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. पण त्याला गुन्हेगारी क्षेत्रात मदत करणारे पोलीस अधिकारी, मोठमोठे नेते आणि मंत्री यांची नावे मैदानात आली नाहीत. विशेष म्हणजे त्याकाळात दबक्या आवाजात याबाबतच चर्चा सुरु असायच्या. पण कोणत्याच नेत्याचे किंवा मंत्र्याचे नाव समोर आलं नाही. तसेच ते जाणीवपूर्वक समोर येऊ दिलं गेलं नाही, अशीही चर्चा होती.

हेही वाचा : देशातली खरतनाक सीरियल किलर, महिला असूनही इतकी दुष्ट? वाचा सायनाईड मल्लिकाच्या गैरकृत्यांची कहाणी

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.