Dawood Ibrahim | 1986 सालच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलेलं? दाऊद कुटुंबासोबत रातोरात कसा फरार झाला?

Dawood Ibrahim | भारताचा सर्वात मोठा शत्रू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अखेरच्या घटका मोजत असल्याच वृत्त आहे. मुंबईत 1993 साली साखळी बॉम्बस्फोटाची मालिका घडवून आणण्यात दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी आहे. दाऊद काही वर्ष आधीच मुंबईतून निसटला होता. त्या रात्री नेमक काय झालेलं? दाऊद कुटुंबासोबत कसा फरार झालेला? त्या बद्दल जाणून घ्या.

Dawood Ibrahim | 1986 सालच्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलेलं? दाऊद कुटुंबासोबत रातोरात कसा फरार झाला?
dawood ibrahim
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 4:08 PM

मुंबई : भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड क्रिमिनल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल पाकिस्तानातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कोणी म्हणत दाऊदवर विषप्रयोग झालाय. कुणी म्हणत त्याला फूड पॉयझनिंग झालय. दाऊदवर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरु असल्याच बोलल जातय. त्याचवेळी दाऊदवर कराचीतील क्लिफ्टन रोडवरील पॉश निवासस्थानी उपचार सुरु असल्याची माहिती आहे. नेमक काय घडतय? दाऊद खरोखरच आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजतोय का? या बद्दल काही खात्रीलायक माहिती नाहीय. दाऊदची बायको जुबीना ऊर्फ मेहजबीन मुंबईची आहे. ती दाऊद सोबत आहे. दाऊदने पाकिस्तानात जाऊन एका पठान महिलेसोबत दुसरा निकाह केला. दाऊदला चार मुलं आहेत. दाऊद पत्नीसहा रातोरात भारतातून फरार झाला होता. सध्या दाऊदची बायको महजबीन दीर अनीसच्या मदतीने दाऊदचे व्यवहार संभाळतेय.

हसन जैदीच्या ‘डोंगरी टू दुबई’ पुस्तकात दाऊद 1986 साली रातोरात भारतातून कसा फरार झाला, त्याची माहिती आहे. 1986 साली मुंबई पोलीस दाऊदच्या मागावर होते. दाऊद आणि मेहजबीनच्या लग्नानंतर 15 दिवसातच पोलिसांनी अंडरवर्ल्डवर लगाम कसण्यास सुरुवात केली. आपल मुंबईत राहणं कठीण आहे, हे दाऊदला कळून चुकलं होतं.

सन्नाटा पाहून पोलीस सुद्धा हैराण

एकेदिवशी क्राइम ब्रांचच्या टीमने अर्ध्या रात्री डी कंपनीच मुख्यालय मुसाफिरखाना येथे छापा मारला. या दोन मजली इमारतीतील सन्नाटा पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले. कारण या इमारतीत लोक कधीच झोपायचे नाहीत. खासकरुन तळमजल्यावर राहणारे. इथे दाऊदच शानदार ऑफिस होतं. क्राइम ब्रांचने इमारतीचा कोपरा न कोपरा तपासला. पोलिसांनी त्या रात्री दाऊदची काही चुलत भावंड आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. पोलीस आयुक्त डीएस सोमन यांनी दाऊदच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं होतं.

दाऊद एक पाऊल पुढे

ऑपरेशन पूर्णपणे सिक्रेट होतं. दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी सोमन यांनी मुंबई पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. पण दाऊद एक पाऊल पुढे होता. त्याने कुटुंबासह भारत सोडण्याचा निर्णय घेतला व रातोरात गायब झाला.

दाऊदने आधी कुठे जाणार विमान पकडलं?

दाऊद हातातून निसटला हे जेव्हा सोमन यांना समजलं, तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण पोलीस दलातच दाऊदने आपल नेटवर्क उभ केलं होतं. पोलीस धडकण्याच्या काही वेळ आधीच दाऊदला टीप लागली होती. त्या 10 मिनिटातच तो निसटला. दाऊदने मुंबई विमानतळावरुन सर्वात आधी दिल्लीच विमान पकडलं, त्यानंतर तो तिथून दुबईला रवाना झाला. दाऊदकडे त्यावेळी कुठला पासपोर्ट होता, या बद्दल माहिती नाही. कारण त्याचा पासपोर्ट क्राइम ब्रांचच्या ताब्यात होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.